Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : पोलिस प्रशिक्षणार्थींना बढतीची संधी! मुख्यमंत्री

Goa Police : वाळपईत ४९ व्या पोलिस कॉन्स्टेबल तुकडीचा दीक्षांत सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police :

वाळपई, राज्यातील लोकांना शांती, सेवा, न्याय मिळायला हवा. लोकसेवा हीच खरी सेवा असावी. त्याकरिता कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची क्षमता पोलिसांच्या अंगी असावी. आज पोलिस दलात ४७३ उमेदवार भरती झाले.

यात दहावीपासून उच्चशिक्षितांचा समावेश आहे. म्हणूनच या तुकडीतील पोस्ट ग्रॅज्युएट, पदवीधारक, मॅकेनिकल इंजिनियर यांना भविष्यात बढतीची संधी मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

४९ व्या तुकडीतील पोलिस कॉन्स्टेबल पदावरील उमेदवारांच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र मैदानावर रविवारी सकाळी आयोजित दीक्षांत सोहळ्याला पोलिस महासंचालक जसपाल सिंग, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य तथा एस.पी. सुचिता देसाई, आयजीपी ओमवीर सिंग बिश्‍नोई, उपप्राचार्य तथा डीवायएसपी नोलास्को रापोस आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले की, ज्यांचे शिक्षण कमी आहे, त्यांनी देखील पुढे नोकरी करत शिक्षण घेतल्यास बढतीची संधी मिळेल. सेवाकाळात वर्दीला काळा डाग लागणार नाही, याची नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे.

वर्दीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नवीन तंत्रज्ञानही आत्मसात केले पाहिजे. पोलिसांनी देश, राज्य सेवेसाठी कटिबद्ध राहून लोकांचा विश्वास आत्मसात केला पाहिजे, असे सावंत म्हणाले.

४७३ उमेदवार पोलिस खात्यात रूजू

४९ व्या तुकडीत १७४ पुरुष, १२५ महिला तसेच दिल्ली येथे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी मिळून ४७३ जण पोलिस खात्यात रूजू झाले.

यावेळी संजय वरक, ऐश्वर्या नाईक, ऋषिकेश शेट, सौरभ नाईक, आत्माराम पोळे, केदार च्यारी यांना इनडोअर, आऊटडोअर विभागातून तर बेस्ट ऑल राऊंडर म्हणून संजय वरक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रनिवेदन अमित नाईक यांनी केले. प्रशिक्षणार्थींना प्राचार्य सुचिता देसाई यांनी शपथ दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT