Sudin Dhavalikar Gomantak Digital Team
गोवा

Sudin Dhavalikar : मडकईतील विकासकामांना चालना!

वीजमंत्री सुदिन ढवळीकर : आमदार निधीतून ढवळी येथे सुशोभिकरणाचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News: मडकई मतदारसंघातील विकासकामांना चालना देतानाच नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार म्हणून आपण कटिबद्ध असून राज्य सरकारच्या आमदार निधीचा पहिला मान मडकई मतदारसंघाला मिळाला असे उद्‍गार मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

मडकई मतदारसंघातील नागरिकांनी नेहमीच आपल्याला प्रेम आणि स्नेह दिला, त्यामुळेच आपण ही विकासकामे करू शकलो, असेही ढवळीकर म्हणाले. ढवळी येथे सत्यनारायण देवालयाच्या मंडप तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा आज अक्षयतृतीया मुहूर्तावर (शनिवारी) प्रारंभ केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, सत्यनारायण देवस्थानचे अध्यक्ष यशवंत नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंता सुधीर परब, इतर अधिकारी कवळेच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर तसेच इतर पंचसदस्य उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले, राज्याच्या आमदार निधी योजनेचा पहिला लाभ मडकई मतदारसंघाला मिळाला असून त्यातूनच ढवळी येथील भगवती देवस्थानचे सुशोभीकरण तसेच सत्यनारायण देवस्थानचे सभागृह व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी हा मान मडकईला दिला असून मडकई मतदारसंघाला चांगले ते देण्याचा आपला सदोदित प्रयत्न असेल, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली. जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांनी आपल्या परोपकारी वृत्तीमुळे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सर्वांकडून प्रेम आणि स्नेह मिळवला आहे.

विकासकामे असो व अन्य कोणतेही काम असो, ढवळीकर यांनी त्यासाठी नेहमीच पुढाकर घेतला असून विकासकामे साकारताना मडकईला एक नवा चेहरा प्रदान करण्यासाठी आमदार तथा वीजमंत्री कार्यरत आहेत, असे नाईक यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक मनुजा नाईक यांनी केले.

सूत्रसंचालन विजय परुळेकर यांनी तर यशवंत नाईक यांनी आभार मानले. दरम्यान, ढवळी येथील भगवती मंदिराच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्करोग चाचणीसाठी ‘दिलासा’बरोबर करार!

मडकई मतदारसंघातील महिलांच्या कर्करोग निदानासाठी फर्मागुढी येथील ‘दिलासा’ इस्पितळाशी माधवराव ढवळीकर ट्रस्टने करार केला असून ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याने त्यादृष्टीने ही तपासणी करण्यात येईल, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ३५ ते ६० वयोगटातील महिलांची चाचणी प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येत असून नंतरच्या काळात साठ वर्षांवरील तसेच पस्तीस वयोगटाखालील महिलांचीही चाचणी करण्यावर भर दिला जाईल असे जाहीर करण्यात आले.

आरोग्य कार्ड करण्यावर भर!

राज्य सरकारने आरोग्याच्या काही व्याधींवर उपचारासाठी आरोग्य कार्ड केले आहे, पण मडकई मतदारसंघातील २७५० कुटुंबांनी या आरोग्य कार्डाचे नूतनीकरण अद्याप केलेले नाही. सध्या कवळे भागात हे काम सुरू आहे, हे काम व्यापक स्वरुपात करण्यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत भर देण्यात येत असून पुढील काळात शिल्लक राहिलेली आरोग्य कार्डे त्वरित नूतनीकृत करण्यात येतील, असे सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री 'नेस्ले कंपनीच्या' समोर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT