CM Pramod Sawant On Employment: 'तरुणांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून राहण्‍याची मानसिकता बदलावी'

सरकारी नोकरीच्‍या मागे धावू नका, खासगी क्षेत्रातही उत्तम संधी
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant On Employment: ‘शेती वाचली तरच गोंयकारपण टिकेल. ‘गोवा कृषी जमीन हस्‍तांतरण निर्बंध कायदा’ त्‍यासाठीच अमलात आणला आहे. काही जण नाहक गैरसमज पसरवत आहेत. तरुणांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून राहण्‍याची मानसिकता बदलावी.

खासगी क्षेत्रात सर्वोत्तम रोजगारसंधी मिळवून देण्‍यासाठी राज्‍य सरकारने ‘रोडमॅप’ तयार केला आहे. आमच्‍यासाठी सत्ता हे ‘साधन’, सामान्‍यांचे हित हे ‘साध्‍य’ आहे. स्‍वयंपूर्ण गोवा हे मिशन असून, त्‍यातून गोमंतकीयांचा उद्धार होईल’, अशी निःसंदिग्ध ग्‍वाही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सुवर्णमहोत्‍सवी वाढदिनानिमित्त त्‍यांनी दैनिक ‘गोमन्‍तक’शी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद साधला. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांची मुलाखत घेतली. राजकारण, समाजकारण, कुटुंब, छंद, ध्येय, आगामी वाटचालीवर मुख्‍यमंत्र्यांनी मोकळेपणाने भाष्‍य केले. रोजगाराच्‍या मुद्यावर त्‍यांनी तळमळीने आपली भूमिका विषद केली.

ते म्‍हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताचे पाहिलेले स्‍वप्‍न आम्‍ही पूर्णत्‍वास नेत आहोत. राज्‍यपातळीवर स्‍वयंपूर्ण गोवा हे माझे मिशन आहे. नुकत्‍याच झालेल्‍या अर्थसंकल्‍पातही त्‍याची चुणूक दिसते. सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे सर्वव्‍यापी नियोजन त्‍यात आहे.’

CM Pramod Sawant
Goa News : देवदासींना पेन्शन, घर द्यावे : सरकारकडे मागणी

शिकाऊ उमेदवारांना 10 टक्के राखीव जागा

एकाएकी गलेलठ्ठ पगार अशक्‍य...

  • डॉ. सावंत म्‍हणाले, तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत, त्‍यांना उत्तम नोकरीच्‍या संधी मिळाव्‍यात, हे ईप्सित मनी बाळगले आहे.

  • गोव्‍यात नोकऱ्यांची कमी नाही. पर्यटन क्षेत्रात तर अमाप संधी आहेत. त्‍या कशा मिळवाव्‍यात याचे भान हवे.

  • एकाएकी गलेलठ्ठ पगार, मोठ्या हुद्याच्‍या नोकऱ्या मिळणे शक्‍य नसते. अनुभव गाठीशी आल्‍यानंतर आपोआप नव्‍या संधी उत्तम अर्थप्राप्‍ती करून देतात. हे तरुण उमेदवारांनी समजून घ्यावे.

सरकारकडून त्रिसूत्रीचा अवलंब

  1. मुख्‍यमंत्री सांगतात, स्‍कील, रिस्‍किलिंग, अपस्‍किलिंगच्‍या उन्‍नयनार्थ सेवा, सुशासन, जनकल्‍याणावर आमचा भर आहे. सोमवारी मिनेझिस ब्रागांझामध्‍ये होत असलेल्‍या कार्यक्रमात त्‍याची तुम्‍हाला प्रचिती येईल.

  2. ‘ॲप्रेन्‍टीसशीप’, ‘फेलोशीप’, ‘इंटर्नशीप’ या त्रिसूत्रीचा सरकारने अवलंब केला आहे. केवळ सरकारी नोकरीची आस न बाळगता खासगी क्षेत्रातही उत्तमोत्तम संधी आहेत. त्‍या स्‍वीकारल्‍या जाव्‍यात, असा ‘रोडमॅप’ तयार होत आहे.

  3. पदवीधर, अभियांत्रिक, तंत्रकुशल (आयटीआय) युवकांना खासगी क्षेत्रात ‘ॲपरेन्‍टीसशीप’ द्यावीच लागेल, अशा तऱ्हेचा नवीन करार सरकारने केला आहे. मात्र, युवकांनी वास्‍तवस्थिती जाणून आपली मानसिकता बदलण्‍याची आवश्‍‍यकता आहे. त्‍यासाठी राज्‍य सरकारही प्रयत्‍नशील आहे.

  4. खासगीच नाही तर सरकारी क्षेत्रातही १० टक्‍के जागा ‘ॲप्रेन्‍टीसशीप’साठी सक्‍तीने ठेवाव्‍याच लागतील, अशी अभिनव तरतूद आमच्‍या सरकारने केली आहे. त्‍यातून अनेक तरुणांना आपल्‍यातील कौशल्‍य विस्‍तारता येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Varun Dhawan Net Worth: कोट्यवधींच्या संपत्तीसह लक्झरीयस आयुष्य जगतो वरूण धवन

काही घटकांकडून बुद्धिभेद

गोंयकारपण जपण्यासाठीच नवा कृषी कायदा अंमलात

मुख्‍यमंत्र्यांनी कृषी कायद्यावरून होणाऱ्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. ते म्‍हणाले, गोमंतकीयांच्‍या उत्‍थानासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेती वाचली तर गोंयकारपण टिकेल. म्‍हणूनच ‘गोवा कृषी जमीन हस्‍तांतरण निर्बंध कायदा’ अंमलात आणला.

काही घटकांनी त्‍याविषयी नाहक गैरसमज निर्माण केले आहेत. भातशेत जमीन फक्‍त शेतकरीच विकत घेऊ शकतो. शिवाय त्‍या जागेचा अन्‍य कारणासाठी उपयोग करता येणार नाही, केवळ शेतीच करावी लागेल. त्‍यात सलग तीन वर्षे खंड पडल्‍यास ती जमीन सरकार आपल्‍या ताब्‍यात घेईल.

शेत जमिनीत फार्म हाउस बनतील हा प्रचार खोटा आहे. विरोधक म्‍हणतात, कृषी कायद्यात त्रुटी आहेत. वास्‍तवात आम्‍ही गोवा जपण्‍यासाठी उचललेले ते भरीव पाऊल आहे.

पक्ष, जनतेचा सदैव ऋणी

विविध टप्‍पे पार करून वयाच्‍या पन्‍नासाव्‍या वर्षी मुख्‍यमंत्रिपदी कार्यरत असणे ही माझ्‍यासाठी खूप मोठी बाब आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्‍या सामान्‍य घरातून आलेल्‍या एका निःस्पृह कार्यकर्त्याला भाजपच्‍या केंद्रीय व प्रदेश नेतृत्‍वासह सहकाऱ्यांनी दुसऱ्यांदा संधी दिली, विश्‍‍वास दाखवला. जनविकासाचे ध्‍येय साध्‍य करण्‍याचे बळ दिले, त्‍यासाठी पक्ष व समस्‍त गोमंतकीय जनतेचा मी शतशः ऋणी आहे, असेही मुख्‍यमंत्र्यांनी विनम्रपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com