Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: नावेलीतून 10 हजार मते मिळवून देणार; महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आश्वासन

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला नावेली मतदारसंघातून 10 हजार मते मिळवून देण्याचे आश्वासन नावेली महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना दिले. साखळीनंतर नावेली मतदारसंघ आपल्यास सर्वात जवळचा वाटत असून या मतदारसंघांतील कार्यकर्ते व विशेषतः महिला कार्यकर्त्या पक्षासाठी झोकून देऊन काम करतात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दवर्ली पंचायत सभागृहात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, प्रदेश सचिव सर्वानंद भगत, दवर्ली दिकरपालचे सरपंच संतोष नाईक, भाजपच्या मडगाव मंडळाचे माजी अध्यक्ष सुबोध गोवेकर, भाजपच्या नावेली मंडळाचे सरचिटणीस दीपक सावंत व प्रमोद प्रभू, माजी पंच मधुकला शिरोडकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात दहा ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

महिला व सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात विजय मिळवणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

पुढील विधानसभा निवडणुकीत नावेलीतून पुन्हा भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा,असे आवाहनही त्यांनी केले.

नावेली मतदारसंघात विकास होत असून, 90 कोटी खर्चून भूमीगत वीज वाहिन्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाय लोकांना उपयुक्त ठरणारी विविध विकासकामेही सुरू आहेत, असे आमदार तुयेकर यांनी सांगितले.

माजी खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे गोव्यासहीत देशभरात चौफेर विकास झाला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताची पत वाढली आहे. विधानसभेवेळी नावेलीत तुयेकर यांना साडेपाच हजार मते मिळाली होती. आता त्यात वाढ होणे गरजेचे असून, लोकसभा निवडणुकीत ही भरीव मते भाजपला मिळावीत,यासाठी खूप काम करावे लागेल,त्याची तयारी सर्वांनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

सर्वानंद भगत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांनी भरीव काम केल्यामुळे व सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे यश मिळवणे शक्य झाले. लोकसभा निवडणूक व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही हाच जोश कायम ठेवून भाजपचा यशाचा झेंडा कायम फडकावत ठेवावा. केले. मोनिका साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा मोघे यांनी आभार मानले.

आश्‍वासन पूर्ण करा!

भाजप उमेदवाराला १० हजार मते मिळवून देऊन आपले आश्वासन पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. ६ फेब्रुवारी रोजी दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, या नावेलीतील कार्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मोदींच्या या सभेला नावेलीतून ३ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आसल्याचे आश्वासनही पूर्ण करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT