Wante news  Dainik Gomantak
गोवा

''विद्यार्थ्यांच्या पंखात विश्वासाचे बळ निर्माण करणे ही काळाची गरज''

वांते नवचेतना प्रगती मंचसंस्थेतर्फे शैक्षणिक गुणगौरव

Sumit Tambekar

गुळेली: विद्यार्थ्यांसमोर समोर असलेल्या खडतर समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पंखांमध्ये विश्वासाचे बळ निर्माण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आपल्या मुलाप्रती पालकांची जबाबदारी महत्त्वाची असून शैक्षणिक विकासासाठी पालक शिक्षकांनी संयुक्तिरीत्या काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अडवई सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आझरा अन्सारी यांनी केले आहे.

(Program for students by Navchetna Pragati Manchsanstha at Wante in Satari taluka)

सत्तरी तालुक्यातील वांते येथील नवचेतना प्रगती मंच यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुलांच्या शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा राज्य महिला मोर्चा सचिव दया तेंडुलकर डॉ. यवंती गावडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शांबा गावडे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गावडे, माजी सरपंच नितीन शिवडेकर यांची खास उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आझरा अन्सारी यांनी सांगितले की, नवचेतना प्रगती मंचने आयोजित केलेले अशा प्रकारचे उपक्रम हे येणाऱ्या काळात गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक संस्था निर्माण होणे काळाची गरज असून यासाठी या संस्थेचा आदर्श इतरांनी घ्यावा अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी बोलताना दया तेंडुलकर यांनी सांगितले की, प्रत्येक गावामध्ये सामाजिक संस्था निर्माण होणे काळाची गरज आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून मुलांना एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ प्राप्त होत असते. शैक्षणिक विकासामध्ये सामाजिक संस्थांचे कार्य महत्त्वाचे आहे.

सामाजिक संस्थानी शैक्षणिक स्तरावर मुलांच्या पाठीवर कौतुकची थाप दिल्यास त्यांना चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण होऊ शकतो व गावातील मुले शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे चमकू शकतात असे यावेळी त्यांनी सांगितले. शैक्षणिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या प्रोत्साहनाचा बाळकडू ठरू शकतो असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी बोलताना शिक्षक शांबा गावडे यांनी सांगितले की नवचेतना प्रगती मंचने आतापर्यंत गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. येणाऱ्या काळात ही संस्था या गावातील प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांचा आधारस्तंभ ठरू शकतो असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

यामध्ये विषम गावडे, मानसी गावडे, तन्मय परवार, आनंद गावडे, रूपाली गावडे, राम गावकर, बाबली चारी, समिता गावडे, रश्मी प्रज्योत गावडे श्रेया गावकर, सुनील गावडे ,संचित जोशी ,अक्षदा गावकर देवानी शिरोडकर,अमरेश गावडे, सुरेंद्र मळीक, राजदीप देसाई रसिता पर्येकर, सिद्धी गावडे दर्शना गावडे तनवी गावडे, चैताली गावडे ,मिलन गावडे हर्ष गावडे, गोविंद गावडे, सुप्रिया गावकर, संपदा गावडे, ओमकार भामईकर, प्राजक्ता गावकर, मंजुषा परीट, अनिश्का गावडे ,श्रावरी वरक, गौरीच्या पिळयेकर, निखिल चारी रचिता वेळीप या दहावी मुलांचा समावेश आहे.

बारावी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रतीक गावडे गौरक्षराज नार्वेकर ,वरूण राणे, विशाखा गावडे, वेदिका नार्वेकर ,तुषार कानसेकर, सपना गावडे, दिक्षिता गावकर, चेतन गावडे, गौरी गावकर अश्विन गावकर, शबाना गावडे, विठोबा गावडे ,तुषार खाटेकर, अनिशा गावडे, मैथिली पिळयेकर, साक्षी गावडे ललिता पुजारी ,नताशा मळेकर करिष्मा गावडे व गोविंदा गावडे चंदेश गावडे यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT