Prof. Indrajit Bhalerao And Dr. Sneha Mahambare Dainik Gomantak
गोवा

Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. इंद्रजित भालेराव

स्वागताध्यक्षपदी डॉ. स्नेहा महांबरे यांची निवड

गोमन्तक डिजिटल टीम

Marathi Sahitya Sammelan: गोवा मराठी अकादमीतर्फे साखळी येथील सरकारी महाविद्यालयात 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम मराठी साहित्यिक प्रा. इंद्रजित नारायणराव भालेराव तर स्वागताध्यक्षपदी डॉ. स्नेहा सुवास प्रभु महांबरे यांची निवड करण्यात आली आहे.

इंद्रजित नारायणराव भालेराव-यांचा जन्म 5 जानेवारी 1962 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रिधोरा या गावी झाला.एम.ए.,एम. फिल. (मराठी) पर्यंतचे शिक्षण,परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करून सेवानिवृत्त झाले.

डॉ. प्रभु महांबरे यांचे शिक्षण एम.ए. ,एम.फील.,पीएचडी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, ह. स. गोखले पुरस्कार 1989, कोपरगावच्या रोहमारे ट्रस्टचा ग्रामीण साहित्य पुरस्कार 1990, म.रा. साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार - 1991, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अनंत काणेकर पुरस्कार - 1992, पद्मश्री विखे ट्रस्ट, प्रवरानगर, प्रेरणा पुरस्कार 1993, साहित्य अकादमी, दिल्ली इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. महांबरे विविध पुरस्कारांनी सन्मानित

सरकारी कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, साखळी येथे त्या मराठी विभाग प्रमुख, सहयोगी प्राध्यापक आहेत.मराठी, हिंदी, कोंकणी, इंग्रजी, संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

त्यांच्या ‘लीळाचरित्र वादस्थळे आणि संपादने ग्रंथाला 2021 चा 'गोमंतक मराठी अकादमी गोवाचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार ,उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार, 2013 मध्ये 'कोकण मराठी साहित्य परिषद’ चा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि शब्द सारथी यांचा गोव्यात राहून मराठी भाषेचे जतन संवर्धन करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा पुरस्कार प्राप्त 2021,आम्ही सिद्ध लेखिका महाराष्ट्रचा 'आम्ही सिध्द लेखिका नवदुर्गा 2021चा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT