Social welfare department building in a bad condition Dainik Gomantak
गोवा

Social Welfare Department: धोकादायक छताखाली अजूनही जीव मुठीत घेऊन काम सुरू

Goa PWD: समाजकल्याण खात्याच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया एक वर्षभरापासून सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पोर्तुगीजकालीन इमारतीत असलेल्या समाजकल्याण खात्याच्या कार्यालयाचे पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड येथे स्थलांतर करण्याची प्रक्रिया एक वर्षभरापासून सुरू आहे. आता पावसाळ्यात इमारतीच्या छताच्या लाकडी सिलिंगचा काही भाग कोसळल्याने कार्यालयाच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला आहे.

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे कार्यालय स्थलांतरासाठी प्रयत्नशील आहेत. मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ज्या गतीने कामे व्हायला हवी होती, ती न झाल्याने येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. आता साबांखा खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे फळदेसाई यांना स्थलांतर करण्यात अडचण येईल असे वाटत नाही.

पावसाळ्यात तरी कार्यालय स्थलांतराची शक्यता दिसत नाही, परंतु छताचा लाकडी भाग निसटत असल्याने कामावर येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच यावे लागत आहे. यापूर्वीही छताचे असे भाग अनेकवेळा कोसळले आहेत.

त्याशिवाय इमारतीचा पहिल्या मजल्यावर जाणेही धोक्याचे दिसते. दरम्यान, समाजकल्याण खात्याच्या कार्यालयात जी घटना घडली त्यानंतर काँग्रेसने आज साबांखाच्या प्रधान मुख्य सचिवांना घेराव घातला होता.

पोर्तुगीज काळातील ही इमारत ‘१८ जून’ मार्गाच्या बाजूला आहे. जुंता हाऊसमधील सरकारी कार्यालये इतर खासगी जागांत भाडे देऊन स्थलांतर करीत आहे. अशा कार्यालयांच्या खात्याकडून त्वरित सोपस्कार केले जातात किंवा करवून घेतले जातात.

मात्र, समाजकल्याण खात्याच्या कार्यालयाच्या स्थलांतराचा हा विषय निकालात कधी निघेल तो निघेल, परंतु विरोधकांना आगामी अधिवेशनात आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT