Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

'बड्डेतील स्थानिकांचे प्रश्न तातडीने सोडवणार'

रमेश तवडकर: कामांना गती देण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

दैनिक गोमन्तक

आगोंद: खोतीगाव पंचायत क्षेत्रातील बड्डे व महाल बड्डे या प्रभागातील अनंत अडचणी आपण गेल्या 3 महिन्यांपूर्वी निवडणूक प्रचारावेळी अनुभवल्या असून मुळात ही जमीन महसूल व वन खात्याची आहे. सर्व समस्या ऐकून या प्रभागाचा विकास करण्याकरता उपाययोजना करून स्थानिकांचे प्रश्‍न तातडीने सोडवणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. तसेच कामांना गती देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

यावेळी त्यांच्यासह उपजिल्हाधिकारी मधु नार्वेकर, मामलेदार मनोज कोरगावकर, जलस्रोत खात्याचे लेस्टर फर्नांडिस, प्रदीप पागी वीज खात्याचे अनुप राणे, अन्य विभागांचे अभियंते तसेच महेश नाईक विशाल देसाई, दिवाकर पागी, आनंदु देसाई, दामोदर लवकर, राजेश गावकर, कृष्ण गावकर, रोहिदास गावकर, रजनीश गावकर व अन्य स्थानिक नागरिक, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बड्डे येथील बैठकीत कृष्णा गावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून या गावात असलेल्या प्रमुख समस्या सभापती व अन्य अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. महाल बड्डे येथील नागरिकांना सतावणाऱ्या प्रमुख प्रश्नांमध्ये पाण्याचा प्रश्न, महादेव मंदिराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक सभागृह वाचनालय, गटार बांधकाम संरक्षक भिंत यांचा उल्लेख रजनीश गावकऱ्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT