'सी. टी. रवी यांना दिलेला पोलिस एस्कॉर्ट बेकायदेशीर'

‘आप’चा आरोप: सत्तेच्या गैरवापराची टीका
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak

मडगाव: भाजपचे गोव्याचे सहप्रभारी सी. टी. रवी यांना राज्य सरकारने सायरन असलेला पोलिस एस्कॉर्ट देणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून तो सत्तेचा गैरवापर आहे अशी टीका आपचे युवा नेते अमित पालेकर यांनी केली आहे.

आज ‘गोमन्तक’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यावर सर्व थरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. या सर्व घटनेवर भाष्य करताना पालेकर म्हणाले, रवी हे भाजप पक्षाच्या कामासाठी गोव्यात आले होते. त्यांना त्यासाठी सरकारी यंत्रणेचा एस्कॉर्ट देणे हेच मुळात चुकीचे असून तो जनतेच्या पैशांचा अपव्ययही आहे. त्यांच्या संरक्षणासाठी जे पोलिस दिले त्यांचा वापर दुसऱ्या चांगल्या कामासाठी करता आला असता.

Amit Palekar
गोवा पंचायत निवडणुका लांबणीवर?

‘आप’ने पंजाबात सरकार आल्यावर असले सर्व थेर बंद करून टाकले आहेत. गोव्यात भाजपने त्यातून बोध घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. दरम्यान या प्रकारावर सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतला असून हा चुकीचा पायंडा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सामाजिक व राजकीय घटनांवर भाष्य करणारे क्लिओफात आल्मेदा यांनी रवी हे केंद्रीयमंत्री असते आणि त्यांना असा एस्कॉर्ट दिला असता तर एकवेळ चालले असते. मात्र, ते साधे आमदार असताना त्यांना ही सवलत देणे ही न पटणारी गोष्ट अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी सत्तेचा गैरवापर करणे ही तर भाजपची परंपराच असे म्हणत जेव्हा ते विरोधात असतात तेव्हाच त्यांना लोकशाही तत्वांचे पडून गेलेले असते अन्यथा नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनीही भाजपचा हा चुकीचा पायंडा असून आम्ही त्या विरोधात आवाज उठवू,असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com