Street lights
Street lights Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पथदीव्यांची समस्या लवकरच सोडवणार: सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील अनेक पथदीवे बंद स्थितीत आहेत. याचबरोबर राज्यातील अनेक भागांतील विजेच्या केबल्स खराब झाल्या आहेत. या समस्यांचे निवारण व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. परिणामी वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतला आहे. (problem of street lights in Goa will be solved soon says Sudin Dhavalikar)

सरकारने (Government) काही वर्षांपूर्वी बसवेलेले पथदीवे बंद पडले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी काळोख पसरलेला असतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या विषयावर बोलताना ढवळीकर म्हणाले, जीर्ण झालेली केबल बदलण्याचे आदेश खात्याला देण्यात येणार आहेत. मी आताच या खात्याचा कारभार हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंडित विजेच्या समस्येवर तोडगा काढला जाईल.

वीज ग्राहकाला फसवण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडले आहेत, विशेषतः अवैध मार्गाने काही आस्थापनांना चोरट्या मार्गाने वीज देण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्य वावरतात, त्यांना बाजूला सारण्यात आले असून असे प्रकार कुठे घडत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे शिस्त ठेवा आणि योग्य वर्तन करा असा इशाराच वीजमंत्र्यांनी या चोरट्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT