कौन बनेगा आमदार Dainik Gomantak
गोवा

गोमन्तकच्या ‘कौन बनेगा आमदार?’ स्पर्धेचे आज बक्षीस वितरण

अनिकेत सावंत प्रथम, महेश गावस द्वितीय तर तिसऱ्या क्रमांकासाठी दोघांची नावे

दैनिक गोमन्तक

पणजी: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ‘गोमन्तक’ने चोखंदळ वाचक, हितचिंतक यांच्यासाठी ‘कौन बनेगा आमदार’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम विजेते ठरलेले पेडणे येथील अनिकेत सावंत यांनी 40 पैकी 38 मतदारसंघांतील उमेदवारांविषयी अचूक अंदाज वर्तवला.

निवडणूक मतदानापूर्वी डिचोली, थिवी, म्हापसा, शिवोली, साळगाव, हळदोणे, पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, कुंभारजुवे, साखळी, प्रियोळ, फोंडा, मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी, कुडतरी, बाणावली, नावेली, केपे, कुडचडे, सांगे या मतदारसंघांत काय होईल, याचा अंदाज लावणे राजकीय पक्ष व उमेदवारांच्या संख्येमुळे कठीण बनले होते. देशातील प्रमुख माध्यम समूहांनाही गोव्याचे राजकीय भवितव्य स्पष्टपणे वर्तवणे शक्य झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेमुळे गोव्यातील आम जनता निवडणुकीसंदर्भात कसा विचार करते, याचा अंदाज घेण्यात आला. या स्पर्धेचे दुसरे बक्षीस मिळालेल्या स्पर्धकाने 36 मतदारसंघांबद्दल भाकित वर्तवले; तर तिसऱ्या क्रमांकाच्या दोन स्पर्धकांनी प्रत्येकी 40 पैकी 32 मतदारसंघांत कोण जिंकून येईल, याचे अचूक अंदाज व्यक्त केले होते.

स्पर्धेत पेडणे येथील अनिकेत सावंत यांना 38 मतदारसंघांत विजयी उमेदवारांचे भवितव्य वर्तवल्याबद्दल पहिले बक्षीस प्राप्त झाले आहे. दुसरा क्रमांक महेश गावस या पर्वरी येथील वाचकाला प्राप्त झाला आहे. त्याने 36 मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ओळखले. तिसऱ्या क्रमांकासाठी दोन दावेदार असून, शैलेंद्र परब (माशेल) आणि प्रज्ञा तुळसकर (पर्वरी) यांनी ३२ मतदारसंघांचे अचूक भवितव्य वर्तवले.

बहुतेक मतदारसंघांतील आडाखे निर्णायक

पहिले बक्षीस मिळालेल्या अनिकेत अविनाश सावंत यांनी डिचोलीत डॉ. चंद्रकांत शेट्ये, थिवीमध्ये नीळकंठ हळर्णकर, म्हापशात जोशुआ डिसोझा, साळगावमध्ये केदार नाईक, हळदोणे येथे कार्लुस फेरेरा, मुरगाव - संकल्प आमोणकर, कुठ्ठाळी - आंतोनिओ वाझ, कुडतरी - रेजिनाल्ड, बाणावली - व्हेंजी व्हिएगश, नावेली - उल्हास तुयेकर, केपे - एल्टन डिकॉस्ता यांचे विजेते म्हणून खूण केली आहे.

सावंत यांचे राजकीय कौशल्य

सांत आंद्रेमध्ये आम्ही जरी विजेता उमेदवार वीरेश बोरकर यांचे यादीमध्ये नाव दिलेले नसले तरी प्रथम पारितोषिक विजेते अनिकेत सावंत यांनी इतर उमेदवारांच्या जागेवर खूण केली. यावरून त्यांचे राजकीय कौशल्य दिसून येते. फोंड्यामध्ये मात्र त्यांनी केतन भाटीकर विजयी होतील तसेच सांगेमध्ये त्यांनी सावित्री कवळेकर यांना पसंती दिली होती.

आज साखळी येथे बक्षीस वितरण

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. त्यांनी दीड लाख रुपयांची बक्षिसे प्रायोजित केली आहेत. उद्या, शुक्रवार दि. 13 मे रोजी साखळी येथे होणाऱ्या ‘गोमन्तक’च्या ‘अमर लता’ कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

SCROLL FOR NEXT