Priya Yadav Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Priya Yadav 3 Day Police Custody: कॅश फॉर जॉब प्रकरणी प्रिया यादवला डिचोली न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला. न्यायालयाने प्रियाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Manish Jadhav

डिचोली: कॅश फॉर जॉब प्रकरणी प्रिया यादवच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. डिचोली न्यायालयाने प्रियाला पुन्हा एकदा झटका दिला. न्यायालयाने प्रियाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रिमांडसाठी प्रियाला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून प्रियाने लाखोंचा गंडा घातला. पोलीस तपासातून प्रियाचे नव-नवे कारनामे देखील समोर येऊ लागले आहेत. फसवणूकीच्या माध्यमातून प्रियाने आतापर्यंत कोट्यवधींची माया जमवली आहे.

डिचोलीत अनेकांना लाखोंचा गंडा

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरून संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह 20 हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले.

कधी नाईक, तर कधी यादव

प्रियाने डिचोलीतील नागरिकांचा खास करुन महिलांचा विश्वास संपादन केला होता. काहींना तिने आपले नाव ‘प्रिया नाईक’, तर काहींना ‘प्रिया यादव’ नाव असल्याचे सांगितले होते. प्रिया सावज हेरुन नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालायची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navi Mumbai Flight: नाताळची भेट! मोपा ते नवी मुंबई विमानसेवेचा दिमाखदार प्रारंभ; पर्यटनाला मिळणार मोठी उभारी; पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Goa ZP Election: दक्षिण गोव्यात संधी होती, पण काँग्रेसनेच ती घालवली; पाटकरांविरोधातील तक्रार आता हाय कमांडच्या दरबारी!

Goa Politics: 'आप'चा माजी मुख्यमंत्री चेहरा आता काँग्रेसच्या वाटेवर? अमित पालेकरांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा; लवकरच घोषणा!

Goa Politics: काँग्रेसचा 2027 साठी मास्टरस्ट्रोक! 'आरजी'चा पत्ता कट, गोवा फॉरवर्डशी जमवणार जवळीक; ठाकरे, निंबाळकरांशी लवकरच चर्चा

Horoscope: सप्ताहाचा शेवट आणि भाग्याची साथ! 'या' राशींना मिळणार कष्टाचे गोड फळ, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT