Govind Gawde  Dainik Gomantak
गोवा

प्रियोळचे मंत्री गोविंद गावडेंना कला संस्कृती खाते; कलाकारांत उत्साह

कला क्षेत्राला न्याय मिळणार: प्रलंबित समस्या मार्गी लागण्याची कलावंतांना आशा

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

गोवा: प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्याकडे पुन्हा कला संस्कृती खाते सोपवल्याबद्दल राज्यातील कलाकार उल्हसित झाले आहेत. गोविंद गावडे हे स्वतः उत्कृष्ट कलाकार असल्यामुळे त्यांना कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे गतवेळी न सुटलेल्या समस्या यावेळी मार्गी लागतील, अशी अपेक्षा कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

गावडे यांनी गतवेळी कलाकारांना चांगलाच न्याय मिळवून दिला होता. हौशी रंगभूमीला मानधन देण्याची प्रथाही त्यांनीच सुरू केली होती. त्याचप्रमाणे कोविड काळात ठप्प झालेल्या हौशी रंगभूमी कलाकारांना दहा हजार रुपये मानधन देण्याची योजना त्यांनी मार्गी लावली होती. त्यामुळे आताही ते कलाकारांच्या हिताच्या नवीन योजना सुरू करतील, अशी अपेक्षा कलाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

यापूर्वी या खात्याला कलाकार असलेला मंत्री लाभला नव्हता. 2012 साली सांतआंद्रेतून निवडून आल्यानंतर विष्णू वाघांना कलासंस्कृती मंत्रिपद मिळेल, अशी आशा व्यक्त होत होती. पण त्यावेळी त्यांची कला अकादमीच्या अध्यक्षपदावरच बोळवण करण्यात आली. पण गेल्यावेळेला मात्र, एका कलाकाराला कला संस्कृती खात्याच्या मंत्रिपदी बसवून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नवा पायंडा पाडला. आणि आता डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात सध्या आनंदी वातावरण असून आपल्या मागण्या तडीस जातील,अशी अपेक्षा कलाकार व्यक्त करताना दिसत आहेत.

कलाकारांचे मानधन वाढवावे: महादेव खानोलकर

गोविंद गावडेंना परत पुन्हा एकदा कला संस्कृती मंत्री केल्याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी तथा राज्यपुरस्कार विजेते कलाकार महादेव खानोलकर यांनी समाधान व्यक्त केले. गेली पाच वर्षे त्यांनी कलाकारांच्या दृष्टीने समाधानकारक काम केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्यांना सध्या मिळणारे 3200 रूपये मानधन अपुरे आहे, त्यात वाढ व्हावी. काही ज्येष्ठ कलाकार हे या मानधनावरच अवलंबून असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाकरिता हे मानधन अपुरे पडते. मंत्री गावडे नक्कीच मानधन वाढवून कलाकारांना न्याय देतील,असेही ते म्हणाले.

कलाकारांचा बहुमान: नामदेव शेट

गोविंद गावडेंना परत एकदा कलासंस्कृती खाते देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कलाकारांचा बहुमान केला आहे, असे मत गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते कलाकार नामदेव शेट यांनी व्यक्त केले. गावडे यांच्यामुळे कलाकारांना एक हक्काचे स्थान मिळाले आहे. इतर पेन्शन घेणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्यांना सर्व कलाकारांसारखेच कला संस्कृती खात्यातर्फे मिळणारे मानधन सुरू केले होते. पण कोविड काळात ते बंद झाले आहे. आता ते मंत्री गावडेंनी पुन्हा सुरू करावे, असे सुचवावेसे वाटते, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT