PM Modi Goa Visit |PM Modi| Mopa International Airport | Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit: 'मनोहर विमानतळ अर्थवेवस्थेक नेट हाडटलो'; गोव्यातील जनतेसाठी मोदींचे खास कोकणी ट्विट

नव्या विमानतळामुळे गोव्याची जगाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

Pramod Yadav

PM Narendra Modi: गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mopa International Airport) उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडले. मोदी यांनी या विमानतळाचे नामकरण 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' गोवा (Manohar International Airport, Goa) असे केले. नव्या विमानतळामुळे गोव्याची जगाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याचा गोव्याच्या पर्यटन वृद्धीला फायदा होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी केले.

दरम्यान, विमानतळाच्या उद्धाटनानंतर नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेसाठी खास कोकणीत ट्विट (PM Modi Tweet In Konkani) केले आहे. "गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि पर्यटकांना उत्तम अनुभव देईल. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांनाही ही श्रद्धांजली आहे." असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या भाषणाची सुरूवात देखील कोकणीतूनच केली. 'गोयांत येवन माका खूब खोस भोगता', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, मोपा विमानतळासाठी 2,870 कोटी रूपये खर्च करण्यात आले असून, 2,132 एकर जमिनीवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे. 2016 साली पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यांनंतर रविवारी मोदी यांच्याच हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. 5 जानेवारी 2023 पासून विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डण संचालनाला सुरूवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

SCROLL FOR NEXT