prices vegetables gorw up Panaji Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable News: गोव्यातील भाजीपाल्याचे भाव चढेच

Goa Vegetable News: कांद्याची चाळीशी, टोमॅटोची पन्नाशी

दैनिक गोमन्तक

Goa Vegetable News: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्याचे जे भाव वधारले आहेत ते उरतण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. दिवसेंदिवस भाजीपाल्‍याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो यांचे दर चढेच आहेत.

त्यासोबतच फळभाज्यांचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी 20 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे टोमॅटो सध्या जवळपास 50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. कोथिंबीर, हिरवी मिरची, वालपापडी आदी भाज्यांचे दरदेखील कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कणगी, करांदे, नांगरचिणी आदींचे पीक घेण्यात येते. दिवाळीपासून कणग्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून अळू माडीदेखील बाजरात दाखल झाली असून विक्रीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते सांगतात.

आकाराप्रमाणे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो दराने कणग्या विकल्या जात आहेत तर मध्यम आकाराची अळू माडी 120 रुपये प्रतिनग दराने विकली जात आहे. करांदे, माडी आदींनादेखील चांगली मागणी आहे.

दर प्रतिकिलो (रु)

कांदा : 40

बटाटा : 40

टोमॅटो : 50

गवार : 60

कोबी : 40

फ्लावर : 40

गाजर : 60-80

भेंडी : 70-80

पालेभाजी (प्रतिजुडी)

मेथी : 20

लालभाजी : 20

कांदापात : 20

मुळा : 20

पालक : 20

शेपू :10

पुदिना : 10

कोथिंबीर : 20-30 रु. जुडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT