Goa Dairy milk  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील दूध उत्पादकांना आजपासून दरवाढ!

गोवा डेअरीची कार्यवाही: दूध विक्री दराचीही आजच होणार अंमलबजावणी

दैनिक गोमन्तक

फोंडा: गोवा डेअरीने दूध दरात वाढ करण्याबरोबरच दूध उत्पादकांनाही दिलासा दिला आहे. गोवा डेअरीला दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना आता प्रतिलिटर दुधातील घटकांप्रमाणे किमान दोन रुपये दरवाढ जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी रविवारी 1 मेपासून होणार आहे. दुसरीकडे डेअरीने दुधाच्या विक्री दरातही दरवाढ केली असून ही दरवाढ सोमवारऐवजी आता रविवार, 1 मेपासूनच लागू करण्यात येणार आहे.

गोवा डेअरीच्या दूध विक्री दरात वाढ केली असून सर्वसाधारणपणे ही दरवाढ चार ते पाच रुपयांपर्यंत असेल. गोवा डेअरीच्या स्टँडर्डाईज्ड, गाईच्या तसेच टोन्ड दुधावर प्रतिलिटर 4 रुपये तर फूल क्रिम दुधावर 5 रुपये प्रतिलिटर दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.

गोवा डेअरीच्या दूध संकलनात वाढ करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. सध्या साधारण 54 ते 55 हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येत असून गोव्याला परराज्यातील दुधावर विसंबून राहावे लागते. राज्याला सध्या किमान अडीच लाख लिटर दुधाची गरज असून ती भागवण्यासाठी गोव्याबाहेरील दूध डेअऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT