Goa Government | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News : देवदासींना पेन्शन, घर द्यावे : सरकारकडे मागणी

गेल्या पंचवीस वर्षांपासून संस्था कार्यरत

दैनिक गोमन्तक डिजिटल

लैंगिक तस्करी रोखण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून येथे कार्यरत असलेल्या अर्ज (अन्यायरहित जिंदगी) या संस्थेने रविवारी गोव्यात राहणाऱ्या देवदासींचे ‘देवदासी प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन’ करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते.

या कार्यक्रमात गोव्यात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि वास्तव्यास असलेल्या आणि कर्नाटकात त्यांची मालमत्ता किंवा नातेवाईक नसलेल्या देवदासींना कर्नाटकातील देवदासींच्या योजनेप्रमाणे पेन्शन आणि घर द्यावे, अशा ठरावाद्वारे गोवा सरकारकडे मागणी केली आहे.

कर्नाटकातील मूळ असलेल्या; परंतु गोव्यात राहणाऱ्या आणि गोव्यात लैंगिक क्रियाकलापात गुंतलेल्या देवदासींसाठी हा कार्यक्रम होता.

दोघींचे समर्पण

2011 ते 2022 या कालावधीत दोन महिलांना देवदासी म्हणून समर्पित करण्यात आले. दोघीही वयाने मोठ्या होत्या आणि अविवाहित माता असल्याने दोघींचे समर्पण कर्नाटकात झाले. 55 देवदासी महिलांपैकी 7 जणींकडे देवदासी प्रमाणपत्रे आहेत, 11 महिलांना 1500 रुपये देवदासी पेन्शन, २ महिलांना दोन लाखांची गृहनिर्माण योजना मदत मिळाली आहे.

परंतु सुमारे 40 देवदासींना विवाह भत्ता, उद्योजकता समर्थन आणि मोरारजी देसाई शाळेतील हक्काच्या सुविधा मिळाल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT