Sonarbaag Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सोनारबाग बंधारा बांधण्यासाठी सरकारकडून दबावतंत्र - आरजी नेते मनोज परब

सरकारचा सोनारबाग येथील बंधारा प्रियोळ येथे येणाऱ्या प्रकल्पाला पाणी पुरविण्यासाठी दबावतंत्र वापरून बांधण्याचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: सोनारबाग येथील बंधारा प्रियोळ येथे येणाऱ्या प्रकल्पाला पाणी पुरविण्यासाठी दबावतंत्र वापरून बांधण्याचा प्रयत्न आहे. डबल इंजिन सरकारने म्हादई नदी कर्नाटक सरकारला विकली आहे. लोकांना गृहीत धरणाऱ्या सरकारने म्हादई नदीप्रमाणे दूधसागर नदीवर बंधारा उभारताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही.

त्यामुळे भविष्यात स्थानिक लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन आरजीचे नेते मनोज परब यांनी केले.

सोनारबाग येथे मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत मनोज परब बोलत होते. यावेळी स्थानिक पंच विनोद मास्कारेन्हास, खांडेपार पंचायतीचे पंच अभिजीत गावडे, मनीष नाईक, आरजी कार्यकर्ते रोहन नाईक, नीलेश गावडे व सुमारे दोनशेहून अधिक लोक उपस्थित होते.

पंचायत मंडळे लोकांसोबत

यावेळी स्थानिक पंच विनोद मास्कारेन्हास यांनी आपण सुरुवातीपासून लोकांबरोबर आहे. प्रकल्पासंबंधी उसगाव पंचायत मंडळानेही लोकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

खांडेपार पंचायतीचे पंच मनीष नाईक यांनी बंधाऱ्याला दोन्ही बाजूंचे लोक विरोध करीत आहेत. खांडेपार पंचायत मंडळ पूर्णपणे लोकांबरोबर आहे. सोनारबाग गावातील लोकांचाही निश्चित पाठिंबा असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT