Soccoro Panchayat Residents Dainik Gomantak
गोवा

Porvorim: सुकूर वसाहत मुद्यावर नाहक राजकारण थांबवा; रहिवाशांचा सज्जड इशारा

Socorro Panchayat: कॉंग्रेस समर्थकांनी खोट्या तक्रारी केल्याचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी मतदारसंघातील सुकूर पंचायतीच्या २० कलमी वसाहत मुद्यावर विरोधकांनी राजकारण करणे त्वरित थांबवावे, असा सज्जड इशारा तेथील रहिवाशांनी आज (मंगळवारी) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

खोट्या तक्रारी करून कॉंग्रेस समर्थक नीलेश चारी जे स्वतः काचेच्या घरात आहेत, ते इतरांच्या घरावर दगडफेक करत आहेत,असा आरोप कुंदन सावंत यांनी केला. यावेळी इब्राहीम आगा, शम्मी धारगळकर, शोभना हरमलकर व अन्य रहिवासी उपस्थित होते. तसेच सुकूरच्या उपसरपंच माया केणी, पंच साची मांद्रेकरही हजर होत्या.

विरोधकांचे हे घाणेरडे राजकारण आम्ही कदापि खपवून घेणार नाही. तोडफोडीचे राजकारण करून जर कोणी विधानसभेची निवडणूक लढवू पाहात असेल तर त्यांना त्यांची जागा आम्ही परत दाखवू ,असा इशाराही सावंत यांनी दिला.

नीलेश चारी यांनी हरमलकर यांच्या विरोधात तर हरमलकर यांनी चारी यांच्या विरोधात पंचायतीत तक्रारी केल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने पंचायतीने पाहाणी केली असता चारी यांचे घर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांवत यांनी सांगितले.

त्यांचे बेकायदेशीर घर पाडण्याचा आदेश पंचायतीने जारी केला असता चारी यांनी पंचायत संचालकांकडे त्याला आव्हान दिले. नंतर ते जिल्हा व उच्च न्यायालयातही गेले. मात्र तेथे त्यांची याचिका सपशेल फेटाळण्यात आली. त्यामुळे सूड भावनेने त्यांनी वसाहतीतील मोजक्याच ६४ घरांविरोधात तक्रारी केल्याचा आरोप सांवत यांनी केला.

राजकारण चालू देणार नाही!

आगा म्हणाले की, हे घाणेरडे राजकारण विरोधकांनी त्वरित थांबवावे. मोजक्याच घरांविरोधात का तक्रारी केल्या आहेत, ते चारी यांनी स्पष्ट करावे. पर्वरी वेल्फेअर फाऊंडेशनच्या नावाखाली काँग्रेसचे पराभूत उमेदवार विकास प्रभुदेसाई यांचे कपटी राजकारण आम्ही इथे चालू देणार नाही,असेही त्यांनी सांगितले. राजकीय स्वार्थासाठी नीलेश चारी यांना सहानुभूती दाखवत ते त्यांचा वापर करीत असल्याची टीकाही आगा यांनी केली. हे घाणेरडे राजकारण नीच पातळीवर त्यांनी आणले असून हे इथेच थांबवा, अन्यथा परिणामास तयार राहा, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT