Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai : सावंत सरकार हे इव्हेंट मॅनेजर सरकार बनले आहे : विजय सरदेसाई

मुख्यमंत्री अर्थसंकल्पावर बोलून स्वतःलाच प्रोमेट करत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Sardesai : "अर्थसंकल्पातून गोमंतकियांना अपेक्षा आहेत पण सरकारकडून त्यांना एकच चॉकलेट मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अर्थसंकल्प हा एक इंव्हेट करायचा आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे इतर मंत्र्यांना विश्‍वासात न घेताच अर्थसंकल्पावर बोलून स्वतःलाच प्रोमेट करत आहेत."

"सावंत सरकार त्यांना जे हवे तेच करणार आहे. सरकारच्या योजना या निवडणूकीपूर्तीच मर्यादित असतात" अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

पणजीतील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सरदेसाई म्हणाले की, "मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ई वाहनांसाठी सवलत देण्याची 5 वर्षासाठीच्या अनुदानाची घोषणा एका वर्षातच बारगळली. 20 कोटींची तरतूद योजनेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आली होती. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे."

"सावंत सरकार हे इव्हेंट मॅनेजर सरकार बनले आहे. सरकार पर्यटनाचा महसूल ड्रग्ज, वेश्‍या व खंडणी यावर अवलंबून आहे. सरकार लोकशाही नियंत्रित करत आहे. जनतेने या सरकारचे फक्त ऐकावे व कोणतीही चर्चा ऐकण्यास ते तयार नाही. अर्थसंकल्प मांडून त्यावर चर्चा न करण्याची प्रथा भाजप सरकारने सुरू केली आहे असा टोला सरदेसाईंनी सरकारवर हाणला.

सरदेसाई म्हणाले, "निवडणुकीपूर्वी गोव्यातील कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती. सत्तेवर आल्यानंतरही त्याची पूर्तता आजपर्यंत करण्यात आलेली नाही. सरकारकडे राज्याच्या विकासाठीच्या दृष्टीचा, नियोजनाचा अभाव आहे."

"सरकारच्या गृह खात्याला हैदराबाद पोलिसांनी प्रमाणपत्र दिले आहे. सावंत सरकारची कार्यपद्धती आकाशवाणीसारखी आहे. मन की बात ऐवजी गोवा की बात त्यांनी सुरू केली. सरकारकडे राज्याच्या विकासाठीच्या दृष्टीचा, नियोजनाचा अभाव आहे" अशी टिका सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT