Goa Congress : ....नफरत को हम तोडेंगे’; काँग्रेसच्यावतीने ‘संकल्प सत्याग्रह' आंदोलन

ओबीसीं‘च्या नावावर भाजपचे राजकारण : पाटकर
Sankalp Satyagraha organised By Goa Congress
Sankalp Satyagraha organised By Goa Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

Sankalp Satyagraha : ‘हात से हात हम जोडेंगे, नफरत को हम तोडेंगे‘ असे म्हणत पुतळा परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज ठिय्या मांडला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा नेते राहुल गांधी यांचे लोकसभा खासदारपद रद्द ठरविले, त्याविरोधात काँग्रेसने आज जुने गोवा येथे ‘संकल्प सत्याग्रह' करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात गोवा प्रदेश काँग्रेसच अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक, एम. के. शेख, माजी आमदार प्रताप गावस, वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष ज्योएल आंद्रादे, विजय भिके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते.

Sankalp Satyagraha organised By Goa Congress
Plane Crash: बापरे...! एअर इंडिया अन् नेपाळ एअरलाईन्सचं विमानं धडकणार होतं, पण

गौतम अदाणींचे 20 हजार कोटी कोणाचे?

पाटकर म्हणाले, भारतीयांचे पैसे निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोकशी यांना चोर म्हटले तर त्यांच्यावर केस दाखल होत आहे. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीर भारत जोडो यात्रा का काढली?

महागाई, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन ही यात्रा काढली. त्यासाठी सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसतर्फे देशभर संकल्प सत्याग्रह सुरू आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, हे स्पष्ट दिसते. खरे बोलले तर भाजप पोलिस तक्रार नोंद करतात. गौतम अदाणींचे २० हजार कोटी कोणाचे? मोदी यांना अदानींशी तुमचा काय सबंध ही विचारणा केली, त्यात काय गैर आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

सत्याग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी त्यांचे नेते जुझे फिलीप डिसोझा उपस्थित होते. डिसोझ यांचे पाटकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. आम्ही भाजपच्याही कार्यकर्त्याना आम्ही आवाहन करतो, उद्या तुमच्यावर राहुल गांधी यांच्याप्रमाणे वेळ येईल, असेही त्यांनी सांगितले.

Sankalp Satyagraha organised By Goa Congress
Goa budget Session 2023 : अधिवेशनात अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल : युरी आलेमाव

डबल इंजिन खोटारडे : आलेमाव

आलेमाव म्हणाले, भारत जोडो यात्रा काढली, त्यातून राहुल गांधी यांना अनेक प्रश्‍न समजून आले. अनेक लोक त्यांच्याशी जोडले जाऊ लागले. भाजप सरकारविरोधी जे प्रश्‍न केले, अदानींविषयी जे प्रश्‍न केले, ते त्यांना पटले नाहीत. भाजपचे डबल इंजिन खोटारडे सरकार आहे. पर्यावरण आणि पुढच्या पिढीचे भविष्य भाजप संपुष्टात आणत आहे. देशात जी हुकमशाही सुरू आहे, ती बंद झाली पाहिजे.

जुझे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या सत्याग्रहास पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच आम्हीही या सत्याग्रहात आले आहेत. गोव्यात हुकूमशाही सुरू आहे. वास्को शहरातील घरांमध्ये हवेने वाहून येणारा कोळसा पाहता, त्याविषयी कोणीही काय बोलत नाही.

आवाज उठवला तर तो आवाज दाबला जातो. महागाई कुठे पोहोचली आहे. लोकांखातीर राहुल गांधी यांना बोलू न देणे म्हणजे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. जोपर्यंत एकत्र येत नाही, त्याशिवाय आपणास यश येणार नाही, हे इतर पक्षांनी लक्षात ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com