President's Police Medal winner Police officer Dainik Gomantak
गोवा

President's Police Medal : गोव्याच्या चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक

गोव्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ

Rajat Sawant

President's Police Medal : सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गोवा पोलिस खात्यातील चार अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलिस महासंचालक जसपाल सिंग (आयपीएस), अधीक्षक विश्राम बोरकर, उपअधीक्षक संतोष देसाई आणि उपअधीक्षक हरिष मडकईकर यांचा समावेश आहे. गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी गोव्यात अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी पोलिस सेवेत काम केले आहे. तसेच विश्राम बोरकर यांनी राज्यपालांचे एडीसी म्हणून काम पाहण्यापूर्वी क्राईम ब्रँच, पोलिस मुख्यालयात उत्तम कामगिरी केली आहे.

या दोघांनाही यापूर्वी गुणवत्तेसाठी (मेरिटोरियस) राष्ट्रीय पोलिस पदक मिळाले असून दुसऱ्यांदा त्यांना विशेष सेवेसाठी (डिस्टिंग्वीश्‍ड) हे राष्ट्रीय पोलिस पदक जाहीर झाले आहे. उपअधीक्षक देसाई आणि उपअधीक्षक मडकईकर यांना गुणवत्तेसाठी राष्ट्रीय पोलिस पदक जाहीर झाले आहे.

डेन्स डिसोझा यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार

गेल्या वर्षी हणजूण येथे लागलेल्या आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉटेल मालकिणीला वाचविल्यानंतर सिलिंडर स्फोटात प्राण गमावलेल्या डेन्स डिसोझा यांना मरणोत्तर मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार जाहीर झाला असून तो उद्या, 26जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT