Ram Nath Kovind President of India Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रपतींचा दौरा: 5 सप्टेंबरपासून तीन दिवस गोव्यात; डागडुजीचे काम युध्दपातळीवर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गोवा दौरा प्रशासकीय विशेषतः राजभवनावरील अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा

दैनिक गोमन्तक

पणजी: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind President of India) 5 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या राज्य भेटीवर येणार आहेत. त्यांचा हा दौरा प्रशासकीय विशेषतः राजभवनावरील (Raj Bhavan) अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा ठरत आहे. राष्ट्रपतींचे वास्तव्य दोनापावल येथील राजभवन येथे असणार असल्याने जीर्ण झालेल्या राजभवनाच्या इमारतीला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तांत्रिक विभागाने केलेल्या पाहणीत राजभवनाची वास्तू कमकुवत झाल्याचे आढळले होते. त्यामुळे सरकारने नवे राजभवन बांधण्याचा विचार बोलूनही दाखवला होता. सरकार आर्थिक अडचणीत असताना नवे राजभवन का, असा सूर जनतेतून उमटू लागल्याने सरकारने पाऊल मागे घेत नवे राजभवन न बांधता सध्याच्या राजभवन इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती व डागडुजी करण्याचे ठरवले होते.

राज्यपालांच्या सचिवांकडून आढावा

राष्ट्रपतींच्या मागील दौऱ्यावेळी विजेचा एक दिवा तुटून पडला होता. त्यामुळे याखेपेला तशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन धास्तावले आहे. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांचा मुक्काम राजभवनावरच असतो. त्यामुळे राष्ट्रपती राहणार असलेल्या वास्तूसह त्यांच्यासोबत येणारा सेवक वर्ग राहणार असलेल्या जागीही डागडुजी करण्यात येत आहे. या साऱ्यांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज राजभवनावर बैठक घेऊन साऱ्या गोष्टींचा आढावा घेतला.

88 एकर परिसरात विविध इमारती

16-17 व्या शतकात बांधण्यात आलेल्या या इमारतीत आर्चबिशप व नंतर पोर्तुगीज गव्हर्नरचे वास्तव्य होते. मुक्तींनंतर राज्यपालांच्या निवासासाठी राजभवन असे नामकरण करण्यात आले. 88 एकर परिसरात राजभवनाच्या विविध इमारती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT