Goa: अनेक खासगी बस अजून बंदच

Goa: रोजीरोटीचा प्रश्‍‍न : कोविडमुळे प्रवासी नसल्‍याने वाहक, चालक, मालक अडचणीत
Goa: Private Buses In Ponda
Goa: Private Buses In PondaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गेल्या वर्षीपासून कोविडची साडेसाती उद्योग-व्‍यवसायाला लागली असून, अजून व्यावसायिक सावरलेले नाहीत. काही उद्योग-व्यवसाय आता सावरत असले तरी स्वयंरोजगार करण्यासाठी ज्या लोकांनी बसगाड्या घेतल्या त्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोविडमुळे व्यवहार थंडावल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील बसवाहतुकीवर (Private Buses In Ponda, Goa) विपरित परिणाम झाला आहे. यामुळे बसचे वाहक, चालक आणि मालक अडचणीत आले आहेत.

फोंडा तालुक्यातून सावर्डे, मडगाव, पणजी, साखळी, मोले आदी भागांत प्रवासी बसगाड्या जातात. पण गेल्या वर्षीपासून कोविडची महामारी आल्याने या बसवाहतुकीवरच थेट परिणाम झाला आहे. हा परिणाम गावागावात जाणाऱ्या बसगाड्यांबरोबरच पर्यटकांची ने-आण करणाऱ्या बसगाड्यांवरही झाला आहे. फक्त खासगी कंपन्यांत तसेच सरकारी खात्यांत कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या बसगाड्या तेवढ्या आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत.

Goa: Private Buses In Ponda
Goa: युतीसाठी दारे उघडी, नाही झाल्यास आम्ही 40 मतदारसंघात लढण्यास तयार - चिदंबरम

इंधनाचे दर परवडेनात

आवश्‍यक तितके प्रवासी मिळत नसल्याने फोंडा तालुक्यातील बहुतांश बसगाड्या अजून बंदच आहेत. वाढलेले इंधनाचे दर तसेच सरकारी कर आणि चालक व वाहकाचा पगार देणे तुटपुंज्या प्रवासी संख्येमुळे शक्यच नसल्याचे बसमालक सांगतात. त्यामुळे सध्या बसगाड्या बंदच ठेवणे पसंत केल्याचे या बसमालकांनी सांगितले.

धंदा चालवायचा कसा...

नोकरी नाही म्हणून कर्ज काढून बसगाडी घेतली. सुरुवातीला चांगली कमाई झाली, पण आता कोविडमुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने बसचा व्‍यवसाय परवडत नाही. गाडीसाठी खर्च करायचा किती, बँकांचे हप्ते भरायचे कसे आणि चालक व वाहकाला पगार द्यायचा कसा, हा प्रश्‍न असल्याने सध्या गाडी बंदच आहे.

- प्रकाश नाईक, उसगाव

नोकरीसाठी वणवण

गेली अनेक वर्षे बसगाडीवर चालक म्हणून काम केले, मात्र कोविडमुळे बहुतांश बसगाड्या बंद असल्याने आता इतरत्र नोकरी करावी लागते. या नोकरीत कसलेही सातत्य नाही. बस सोडून ट्रकवर नोकरी धरली, पण त्यातही सातत्य नाही. खाणी बंद आहेत, काम अधूनमधूनच मिळते, त्यामुळे घर चालवायचे कसे, तुम्हीच सांगा.

- रावजी गावकर, धारबांदोडा

पगारात सातत्य नाही

कोविडमुळे बसगाड्यांच्या व्यवहारात मंदी आल्याने वाहक म्हणून काम करणे शक्य होत नाही. प्रवासी नसल्याने बऱ्याचदा बसची फेरी बंद करण्याची वेळ येते, त्यामुळे खर्च परवडत नाही. बसमालक तरी काय करणार, त्यामुळे आज पगार मिळाला तर उद्या मिळत नाही.

- सोनू नाईक, वरचा बाजार-फोंडा

Goa: Private Buses In Ponda
Goa Railway Passenger Service: " वास्को ते कुळे रेल्वे मार्गावर आता 'DEMU Train' धावणार "

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com