Margao Municipal Council Dainik Gomantak 
गोवा

Margao Muncipality: गुप्त मतदानाद्वारेच होणार मडगाव नगराध्यक्ष निवड

सरकारची माहिती, याचिका निकालात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक गुप्त मतदानाद्वारे घेतली जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर दिली. त्‍यानंतर माजी नगराध्यक्ष घनश्‍याम शिरोडकर यांनी दाखल केलेली याचिका निकालात काढली. काही दिवसांपूर्वी 15 नगसेवकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला होता, तो मंजूरही झाला.

मडगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत घनश्‍याम शिरोडकर यांची 15 विरुद्ध 10 मतांनी निवड झाली होती. त्यामुळे दिगंबर कामत व भाजप गटाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांना पराभव पत्करावा लागल्याने या गटाला जबरदस्त धक्का बसला होता. त्यांच्याकडे 15 नगरसेवक असताना त्यातील 05 जणांनी दामोदर शिरोडकर यांच्याविरोधात मतदान केले होते.

त्यामुळे या गटाच्या 15 नगरसेवकांना बोलावून कामत व भाजप गटाने त्यांच्या सह्या घेऊन अविश्‍वास ठराव दाखल करण्यास सांगितले होते. हा ठराव येण्यापूर्वीच घनश्‍याम शिरोडकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हा ठराव 15 नगरसेवकांनी हात वर करून मंजूर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT