Margao Municipality: मडगावच्या नव्या नगराध्यक्षाच्या निवडीसाठी पालिका प्रशासन संचालक कधी तारीख जाहीर करतात याकडे मडगावमधील लोकांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच गोवा फॉरवर्डचा पाठिंबा असलेले माजी नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर हे या प्रकरणात न्यायालयात जाण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे हा मुद्दा न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या निवडीसाठी गुप्त मतदान पध्दत, तर अविश्वास ठरावावरील मतदानासाठी हात उंचावून मतदानाचा अवलंब गेला होता व त्यानंतर अशी वेगवेगळी पध्दत का असा मुद्दा उपस्थित केला गेला होता. तोच मुद्दा पकडून निर्वाचन अधिकाऱ्यांच्या त्या निवाड्याला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे.
नगराध्यक्ष निवडीवेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोटवाले हे निर्वाचन अधिकारी होते व त्यांनीच गुप्त मतदान पध्दतीचे निर्देश दिले होते, तर अविश्वास ठरावावेळी सचिवालयांतील वित्त विभागातील सचिव विकास गावणेकर निर्वाचन अधिकारी होते व त्यांनी हात उंचावून मतदानाचा निवाडा दिला होता. तसेच पालिका कायद्यात गुप्त मतदानाची कुठेच तरतूद नसल्याचे स्पष्ट केले होते.
पालिकेत भाजपा गटात पंधरा तर फॉरवर्डकडे त्याचे नऊ तर अपक्ष घनःश्याम मिळून दहाजण आहेत. हात उंचावून निवड झाली, तर आपले काहीच साध्य होणार नाही म्हणून फॉरवर्डचे कार्यकर्ते कोर्टाची भाषा करू लागले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.