President Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Presidential Polls : गोव्यात काँग्रेसची तीन मते फुटली!

दैनिक गोमन्तक

पणजी : राष्ट्रपतिपदी निवड झालेल्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना गोव्यातून 40 पैकी 28 मते मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विरोधकांची 3 मते फुटली, ती काँग्रेसची असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भाजप सरकारकडे 25 आमदार होते. विरोधकांमधील फक्त तीनच आमदारांची मते फुटल्याने काँग्रेसने मात्र निःश्‍वास सोडला आहे. ही मते आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत आणि राजेश फळदेसाई यांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील काही आमदारांनी भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू केल्याने काँग्रेस नेत्यांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला 25 पेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा केला होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली होती. काँग्रेस आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते; मात्र तीन आमदारांची मते भाजप उमेदवाराच्या पारड्यात पडल्याने काँग्रेस नेत्यांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत 3 आमदारांची मते फुटली. त्यामध्ये काँग्रेसचे आमदार असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार मायकल लोबो यांची विरोधी पक्ष नेते पदावरून तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे काँग्रेसचे केंद्रातील कायमस्वरूपी निमंत्रित सदस्यपद काढून घेतल्याने ते नाराज आहेत. आमदार राजेश फळदेसाई हे पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसची 3 मते फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी काँग्रेस गट अजूनही प्रबळ आहे.

दरम्यान विरोधी आमदारांची तीन मते फुटली; परंतु ही काँग्रेसची आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आमच्या आमदारांनी मतदानानंतर आमच्या गटाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. त्यांच्यावर मला विश्‍वास आहे. विधानसभा अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT