president election 2022 Dainik Gomantak
गोवा

president election 2022: गोव्यात 100 टक्के मतदान

Sumit Tambekar

देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी सत्ताधारी गटातून ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाकडून संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होती. (President election 2022: 100 percent voting in Goa )

या पार्श्वभूमीवर आज गोवा राज्यातील मतदान पर्वरी विधानसभा संकुलाच्या तळ मजल्यावर विशेष मतदान कक्षात आज मतदान पार पडले.यानिमित्ताने गोवा राज्यातील आमदार, खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आली होती. या ठिकाणी राज्यातील 40 आमदार 2 खासदार आणि 1 राज्यसभा खासदार यांनी मतदान केले.

राष्ट्रपती निवडणूकीसाठी 4809 मतदारांनी केले मतदान

आज सकाळपासून कडक शिस्तीत हे मतदान पार पडले. यासाठी गोवा राज्यातून 100 टक्के मतदान झाले आहे. यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील 776 खासदार, तसेच देशातील सर्व विधानसभांचे 4033 आमदार असे एकूण 4809 मतदार मतदान केले.आज गोवा राज्यात पार पडलेल्या मतदानाच्या मतपेट्या आज रात्रीच विमानाने मत मोजणीसाठी पाठवल्या जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT