काँग्रेस कारवाईनंतर दिगंबर कामत यांनी सोडले मौन म्हणाले...

कारवाईसाठी काँग्रेसला दिली संपूर्ण मोकळीक
काँग्रेस कारवाईनंतर दिगंबर कामत यांनी सोडले मौन म्हणाले...
Published on
Updated on

गोवा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीतून कायम निमंत्रित सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे ट्विट काल दिनांक 17 जूलै रोजी राष्ट्रीय काँग्रेसने केले होते. या कारवाईनंतर कामत यांनी कोणते ही भाष्य न करता मौन भुमिका घेतली होती. यानंतर आज मात्र कामत यांनी याबाबतचे मौन सोडले असून पक्षाने केलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे. (I will accept the role that the Congress party will take towards me - Digambar Kamat )

कामत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वी ही माझ्याबद्दल अनेक अफवा उठत होत्या. तसेच राष्ट्रीय काँग्रेसने ही माझे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगितले होते. मात्र पुन्हा आपले हे विधान बदलत सदस्यत्व रद्दची कारवाई केली जाणार नाही, अशी भुमिका घेतली होती.

त्या प्रमाणे आजच्या घडीला मी असे सांगतो की, पक्ष जी भुमिका माझ्याबाबतीत घेईल ती मला मान्य असेल असे ते म्हणाले. त्यामूळे पक्षाने काय भुमिका घ्यावी आणि काय नाही. हा सर्वथाने पक्षाने ठरवावे असे ही ते म्हणाले. मला याबाबत काही वेगळी भुमिका घ्यायची नाही. असे ते म्हणाले.

दिगंबर कामत यांची भुमिका काय दर्शवते ?

राष्ट्रीय काँग्रेसने दिगंबर कामत यांच्यावर काँग्रेस वर्किंग कमिटीतून कायम निमंत्रित सदस्य पद रद्दची कारवाई केली. कामत यांचा काँग्रेसमधी इतक्या वर्षाची जवळीक, असे असताना काँग्रेसने ही कारवाई केली. असे असून ही कामत यांनी मवाळ भुमिका का घेतली ? यावर विचार केल्यास कामत यांनी काँग्रेस आमरांना घेत भाजपात प्रवेशासाठीचे बंड केले होते याचे नेतृत्व कामत यांनीच केले असावे ही शंका बळाल्याखेरीज राहात नाही. मात्र कामत यांनी आजपर्यंत कधीत भाष्य केलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com