Officials inspected vehicles and roads Dainik Gomantak
गोवा

SCO Meeting in Goa: शांघाय परिषदेची तयारी पोहोचली अंतिम टप्प्यात; बाणावलीत कडक बंदोबस्‍त

संबंधित यंत्रणांकडून पाहणी; आठ देशांचे विदेशमंत्री येणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

SCO Meeting in Goa: शांघाय सहकार्य संघटनेची यंदाची परिषद गोव्यात 4 व 5 मे रोजी होत आहे. या परिषदेच्या बैठकीच्या तयारीला वेग आला असून ती अंतिम टप्‍प्‍यात आली आहे.

बाणावलीत होत असलेल्या या बैठकीला संघटनेतील विदेशी मंत्री सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज या बैठकीच्‍या ठिकाणी सचिव, नोडल शिष्टाचार अधिकारी संजित रॉड्रिगीस यांनी पाहणी केली.

दाबोळी विमानतळ ते बाणावलीपर्यंतच्या रस्त्यांची वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रॉड्रिगीस यांनी पाहणी केली.

यावेळी त्‍यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आरटीओ, पीडब्ल्यूडी, डीआय कलेक्टर, पोलिस, वीज आणि इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संजित रॉड्रिगीस यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही संबंधित खात्याच्या  अधिकाऱ्यांना  महत्त्‍वपूर्ण सूचना केल्या आहेत.

येत्या दोन दिवसांत रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करण्यात येतील. वाहतूक समस्या असली तरी त्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात येत आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या या बैठकीला भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर, चीनचे क्वीन गॅंग, पाकिस्‍तानचे बिलावल भुट्टो, रशियाचे सर्जी लावरोव उपस्थित राहणार आहेत.

एकूण आठ देशांचे विदेशमंत्री सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

भौगोलिक क्षेत्रात जगाची 42 टक्के लोकसंख्या

शांघाय कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.

भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीनेही जगातील सर्वांत मोठी प्रादेशिक संस्था आहे, जी युरेशियाच्या सुमारे 60 टक्के क्षेत्रफळ व्यापते. जगाच्या लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्या या भागात येते.

१९९६ मध्ये पीपल्स ऑफ चायना, कझाकिस्तान, किरगिस्‍तान, रशिया आणि ताजिकिस्तान यांच्यादरम्यान शांघाय-५ची स्थापना करण्यात आली होती.

आता या संघटनेची व्याप्ती वाढली आहे. त्‍यात २०१७ मध्ये उझबेकिस्तान, पाकिस्तान आणि भारत सहभागी झाले आहेत. दरवर्षी या देशांच्या मूलभूत प्रश्नांवर बैठकीत चर्चा होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT