Madgaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

मॉन्सूनपूर्व कामाचा मडगाव पालिकेला सापडेना मुहूर्त!

कामे खोळंबल्याने शहरातील गटारे, नाले तुंबले

दैनिक गोमन्तक

मडगाव : पाऊस सुरु होण्यास अवघे दोन आठवडे असतानाही मडगाव शहरात मॉन्सूनपूर्व कामे झाली नसल्याने गटारे व नाले तुंबले आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने मॉन्सूनपूर्व कामे करण्यासाठी मडगाव पालिका मुहूर्त सापडणार तरी कधी? असा प्रश्न लोकांतून विचारला जात आहे. मडगाव पालिकेने मॉन्सूनपूर्व कामाचे कंत्राट दोघांना दिले असले तरी या कामाला सोमवारनंतर सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. या कामांसाठी फक्त एक आठवडा मिळणार असल्याने सध्या पालिकेवर टीका होत आहे.

मडगावात प्रत्येक पावसात रस्ते पाण्याखाली जात असतात. यावेळी गटारेही साफ होण्याची शक्यता असल्याने लोकांना आणि विशेषतः दुकानदारांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अशातच मडगाव बाजारात रस्त्यावर जो हॉटमिक्स डांबराचा थर घालण्यात आला त्याची उंची दुकानाच्या फुटपाथपेक्षा वर गेल्याने पावसाचे पाणी दुकानांत शिरण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मडगाव पालिकेचा कारभार म्हणजे कोण कुणाला वाली नाही अशाच प्रकारचा आहे. पालिकेने वीज खात्याचे 5.50 लाखांचे बिल अजून न भरल्याने वीज खात्याने त्यांना तगादा लावला आहे. मडगाव पालिकेची करांच्या वसुलीची थकबाकी 20 कोटींवर पोहोचली असून, परिस्थिती अशीच राहिल्यास पालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार घालण्यास पैसे नसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मडगाव पालिकेच्या या अनास्थेबद्दल शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मडगावकरांनी ज्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले त्यांना मडगावचेच पडून गेलेले नाही. शहरप्रती नगरसेवक गांभीर्याने घेत नाहीत. ते आपल्या कर्तव्याला जागत नाहीत, अशी टीका कुतिन्हो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT