INAUGRATION OF DEVELOPMENT PROJECTS Dainik Gomantak
गोवा

Shirgao : भूमिगत वीजपुरवठा; आमदार शेट यांच्या हस्ते लोकार्पण

शुक्रवारपासून कार्यान्वित

दैनिक गोमन्तक डिजिटल

भूमिगत वीज केबलद्वारे शिरगाव गावात वीज प्रवाह कार्यान्वित झाला असून, शुक्रवारी (ता.२१) सायंकाळी आयोजित एका विशेष सोहळ्यात आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार शेट यांनी कळ दाबताच भूमिगत केबलद्वारे वीज प्रवाह सुरु झाला. यावेळी आमदारांच्या हस्ते दोन नवीन वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्‍घाटनही करण्यात आले. भूमिगत वीज प्रवाह कार्यान्वित झालेले शिरगाव हे मये मतदारसंघातील प्रथम गाव ठरले आहे.

सरकारचा सकारात्मक पाठिंबा आणि शिरगाववासियांच्या सहकार्यामुळे शिरगावमधील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अल्पावधीत पूर्णत्वास येऊ शकला, असे शेट यांनी सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

या लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, शिरगावची सरपंच करिश्मा गावकर, उपसरपंच जयंत गावकर, पंच वेदिका शिरगावकर, सूर्यकांत पाळणी, देवराज गावकर, श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर, मयेचे सरपंच सुवर्णा चोडणकर, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे माजी सरपंच तुळशीदास चोडणकर, विश्वास चोडणकर, विजय पोळे, जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, वन-म्हावळींगेची माजी सरपंच शीतल सावळ, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता रामचंद्र मुद्रास आदी अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकर चोडणकर यांनी यावेळी बोलताना आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विकासकामांचा धडाका लावताना केवळ वर्षभरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावल्याचे सांगितले. भूमिगत वीज प्रवाह योजनेसह शिरगावात धोंड तळीचा विकास आदी कामे गतीने पूर्ण केल्याबद्दल गणेश गावकर यांनी समाधान व्यक्त केले. श्री लईराई देवस्थानतर्फे त्यांनी आमदारांना शुभेच्छाही दिल्या.

साडे अकरा कोटींचा प्रकल्प

वीज खात्यातर्फे सुमारे साडेअकरा कोटी रूपये खर्चून शिरगाव येथे भूमिगत केबल योजना राबविण्यात आली आहे. शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेच्या तोंडावर भूमिगत वीज प्रवाह कार्यान्वित झाल्याबद्दल शिरगावच्या नागरिकांनी सरकारासह आमदारांना धन्यवाद दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT