Goa vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: गोव्यात विदेशवासीयांचे रविवारी लसीकरण

गोवा (Goa) राज्यातील गर्भवती महिलांना 9 जुलैपासून लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा (Goa) राज्यातील गर्भवती महिलांना 9 जुलैपासून लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भवती महिलांच्या (Pregnant Women) लसीकरणासाठी गोव्यातील डॉक्टर व परिचारिकांना राष्‍ट्रीय पातळीवर प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना राज्यस्तरीय प्रशिक्षणही देण्यात आले. (Pregnant women in Goa will be vaccinated from July 9)

केंद्र सरकारने गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे (SOP) जाहीर केली आहेत. त्यानुसार हे लसीकरण होणार असून गर्भवती महिलांनी जवळच्या आरोग्य केंद्रातील लसीकरण विभागात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन डॉ. बोरकर यांनी केले आहे.

अल्‍पोपहार करावा

विशेषत: सकाळच्या सत्रात गर्भवती महिलांनी लसीकरण केंद्रात जावे. कारण, नंतर गर्दी होते. तसेच उपाशीपोटी न जाता अल्‍पोपहार करून जावे जावे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास होतो, तसा काही गर्भवती महिलांनाही होऊ शकतो. मात्र, तो धोकादायक नसेल, असेही डॉ. बोरकर यांनी स्पष्ट केले. राज्यात आत्तापर्यंत 74 टक्के लसीकरण झाल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी त्वरित लसीकरण केंद्रात जाऊन ती घ्यावी, असे आवाहन केले.

परदेशींना रविवारी लसीकरण

ज्यांच्याकडे भारतीय ओळखपत्र नाही, अशा लोकांना नेपाळी व इतरांना रविवारी मडगाव येथील टी. बी, इस्पितळ लसीकरण केंद्रात लसीकरण केले जाणार आहे. यापूर्वी पणजी व आसगाव येथे पहिल्या टप्प्यात या लोकांना लसीकरण केले होते. आता मडगाव येथे 11 जुलै रोजी लस दिली जाणार आहे. पुढील काळात उत्तर गोव्यात व दक्षिण गोव्यातही अशा लोकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील लोकांनी मडगावात गर्दी करू नये, अशी सूचना डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT