Weddings In Rain X
गोवा

Goa Rain: लग्नांच्या उत्साहावर पावसाचे विरजण! विवाह सोहळ्यांचे वाजले तीनतेरा; वधू-वरांची कसरत

Sanquelim Rain: साखळी शहरात तसेच बाजारातील अनेक रस्त्यांवर पावसाचे मातीमिश्रित पाणी साचले होते. या पावसामुळे अनेक विवाह सोहळ्यांचे तीनतेरा वाजले.

Sameer Panditrao

साखळी: गेले काही दिवस तुरळकपणे पडणाऱ्या पावसाने मंगळवार, २० मे रोजी सकाळीपासून साखळी शहरात व परिसरात जोरदार वृष्टी करीत झोडून काढले. सकाळीच विजेचा लखलखाट व गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाचा जोर हा संध्याकाळी बराच वाढला होता.

त्यामुळे साखळी शहरात तसेच बाजारातील अनेक रस्त्यांवर पावसाचे मातीमिश्रित पाणी साचले होते. या पावसामुळे मंगळवारी अनेक विवाह सोहळ्यांचे तीनतेरा वाजले. सकाळपासूनच जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे वधू-वरालाही वाहनांमध्ये बसताना बरीच कसरत करावी लागली.

Goa Rain Updates

त्याचप्रमाणे लग्नाच्या मंडळीलाही मोठी मेहनत घेऊन प्रवास करावा लागला. अनेक रस्त्यावर पाणीच पाणी असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच लोकांनाही पाण्यातूनच वाट काढावी लागली.

नगरपालिकेला दुहेरी काम

साखळी नगरपालिकेतर्फे सध्या मान्सूनपूर्व कामांना वेग देण्यात आलेला आहे. अनेक भागांमधील गटरातील माती, कचरा काढण्यात येत असतानाच या जोरदार पावसाच्या पाण्याने गटरातील कचरा व माती रस्त्यावर आली. त्यामुळे आता नगरपालिकेला हे गटर व रस्ते साफ करण्याचे दुहेरी काम पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumah Angry: "मी तुम्हाला बोलवलं नाहीय..." मैदानात साधा दिसणारा 'जस्सी' पापाराझींवर का चिडला? पाहा Viral Video

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

Goa Live Updates: आगरवाड्यात 25 रोजी आकाशकंदील स्पर्धा

IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

अग्रलेख: कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाचा एक हक्काचा 'कैवारी' हरपला

SCROLL FOR NEXT