Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणातील सलीम दोडामणीलाही अटकपूर्व जामीन नाकारला

संशयितांच्या अटकेसाठी शोध मोहीम

दैनिक गोमन्तक

Land Grabbing Case: मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून मडगाव येथील एका वृद्ध कपड्याच्या व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेला या प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणी यानेही अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज शुक्रवारी (ता.१९) दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी फेटाळून लावला. गुरुवारी (ता.१८) त्याचा दुसरा साथीदार राजदीप कुंडईकर याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज न्या. आगा यांनी फेटाळून लावला होता.

मडगाव पोलिस याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात चालढकल करत असताना ‘दै. गोमन्तक’ने या प्रकरणाला वाचा फोडल्यावर अवघ्या आठ तासांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे दोन्ही संशयित फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी मडगाव पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

हे जमीन हडप प्रकरण म्हणजे सुनियोजित कट असून मृत नोटरीचे नाव वापरून कागदपत्रे कशी तयार केली गेली आणि यासाठी कुणाचा आधार घेतला गेला याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सलीम आणि राजदीप यांना कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

एका नोटरीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

या संशयितांकडून जमीन खरेदी केलेले महमद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत या दोघांना काल अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण पाच जणांवर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी वेधले लक्ष : दोडामणी याच्या जामीन अर्जाला विरोध करताना मडगाव पोलिसांनी तो एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याला चोरीच्या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केली होती तर एका वकिलाला धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर वेर्णा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापसा दरोडा! दरोडेखोरांची टोळी 4 राज्ये ओलांडून बांगलादेशात? पोलिसांचे प्रयत्न तोडके

Rama Kankonkar: 'रामा काणकोणकर' पडले एकाकी? विरोधकांचा थंड प्रतिसाद; भाजप पोलिस तक्रार करण्याची शक्यता

Horoscope: नोकरीत बढती, नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस; वयाने तरुण असाल तर 'या' राशींचे उजळेल भाग्य!

Goa Assault Case: काणकोणात ज्येष्ठ नागरिकांना मारहाण, उप-जिल्हाधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या घेऱ्यात; कुटुंबाने केले गंभीर आरोप

Bus Accident: भीषण अपघात! बस दरीत कोसळून 42 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

SCROLL FOR NEXT