Pratima Coutinho AAP
Pratima Coutinho AAP Dainik Gomantak
गोवा

कोविडयोद्ध्यांना नोकऱ्यांमध्‍ये प्राधान्य द्या, अन्यथा...

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडयोद्ध्यांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच आमच्‍या मागण्‍या आठवडाभरात पूर्ण न झाल्यास 50 एमटीएस कर्मचाऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्‍होंनी दिला आहे.

महामारीच्या काळात कोणीही धोका पत्करण्यास तयार नसताना दक्षिण गोव्यातील 50 एमटीएस कर्मचारी दक्षिण जिल्हा कोविड केअर आरोग्य केंद्रात रुजू झाले. त्यांच्या प्रयत्नांनी प्रभावित होऊन प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने या एमटीएस कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे वचन दिले होते. सरकारने त्यांच्या कार्याला मान्यता देऊन त्यांचा कोविडयोद्धा म्हणून सत्कार केला असला तरी, त्यांना नोकरीतून काढून टाकल्याने त्याला आता काही अर्थ उरला नाही. या सुमारे 50 कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांचे कामकेले. त्यांना सुमारे 20 हजार रुपये देण्‍यात आले, असे कुतिन्‍हो (Pratima Coutinho) म्‍हणाल्‍या.

लाचखोरी आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या भाजप सरकारला महामारीच्या काळात जीव धोक्यात घालणाऱ्या या कर्मचाऱ्यांची मुळीच काळजी नाही. त्यांनी रुग्णांना मदत केली, डायपर बदलले, मृतदेह स्वच्छ केले. त्यांनी स्वतंत्र घर भाड्याने घेतले कारण गावकरी त्यांना त्रास देत होते. या कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री (CM) व आरोग्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही त्यांचे ऐकले नाही, असा आरोपही कुतिन्‍हो यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT