Hindu Raksha Maha Aghadi  Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीजकालीन उद्ध्वस्त मंदिराचे एकच प्रतिकात्मक मंदिर! निर्णय मान्य नाही, सरकारचे पळ काढण्याचे धोरण; हिंदू रक्षा महाआघाडी

Frontispiece Church Controversy: सरकारचे पळ काढण्याचे धोरण आम्हाला मान्य नसल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

Frontispiece Church Controversy

पणजी: पोर्तुगीजकालीन उद्ध्वस्त मंदिराचे एक प्रतिकात्मक मंदिर उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जी केली आहे ते सरकारचे पळ काढण्याचे धोरण असून हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

ते पुरातत्व संचालनालयाला सांकवाळ वारसास्थळावरील अतिक्रमण रोखण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी बोलत होते. यावेळी नितीन फळदेसाई, सुभा सावंत, चंद्रकांत पंडित उपस्थित होते. मंदिरे उभारण्यासाठी योग्य ते पुरावे नसल्याचे जे सरकार सांगत आहे ते चुकीचे असून यासंबंधीचे धडधडीत पुरावे अाहेत.

जर सरकार अयोध्येनंतर काशी, मथुराचे मागणी करत आहे त्याऐवजी दिल्लीत प्रतिकात्मक मंदिर बांधल्यास काय होईल? असा खोचक वेलिंगकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

सांकवाळ येथील जागा आम्ही चर्चच्या घशात जावू देणार नाही त्यासाठी आम्ही राज्यभर जनजागृती करणार आहोत, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

जागा चर्चच्या घशात जाऊ देणार नाही!

सांकवाळ येथील जागी विजयदुर्गेचे मंदिर होते; परंतु आता ती जागा चर्च बळकावत आहे. मागील ११ वर्षांपासून मतांसाठी सरकारचा छुपा पाठिंबा चर्चला मिळाला आहे. परंतु आता पुरातत्व खात्याद्वारे योग्य ते पुरावे गोळा केले जात असल्याचे समाधान आहे, ही जागा आम्ही कदापि चर्चच्या घशात जाऊ देणार नाही,असे वेलिंगकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

Horoscope 20 Saptember 2026: ग्रहांची महा-युती आणि 12 राशींचा टर्निंग पॉईंट! काहींना धनलाभ तर काहींना धोक्याचा इशारा; आजचा दिवस ठरणार 'गेमचेंजर'

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

SCROLL FOR NEXT