Goa Government  Dainik Gomantak
गोवा

Goa: खाण कामगारांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

खाण महामंडळ स्थापन करून खाणीं सुरु करण्यासाठी सरकारची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: खाणी सुरु होईपर्यंत सरकार कामगारांना सहजासहजी वाऱ्यावर टाकणार नाही. सरकारकडून कामगारांना शक्य ते सर्व पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी डिचोलीतील (Bicholim) सेझा कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.27) पर्वरी येथे विधानसभेच्या परिषद सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडून निवेदनाव्दारे मागण्या सादर केल्या. (Pramod Sawant has said that he will solve the problems of the miners)

खाण महामंडळ स्थापन करून खाणीं सुरु करण्यासाठी सरकारची प्रक्रिया सुरु आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगून कामगारांच्या मागण्यांवर अभ्यास आणि विधानसभेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कामगारांचे कायदा सल्लागार ऍड. अजय प्रभूगावकर, कामगार संघटनेचे किशोर लोकरे, नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, राजेश गावकर, दीपक पोपकर, संजय मांद्रेकर, बाबुसो कारबोटकर, महेश होबळे, अनिल सालेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार प्रतिनिधींना स्थान द्या

खाण महामंडळात कामगारांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे. अशी मागणी कामगार संघटनेचे सल्लागार ऍड. अजय प्रभूगावकर यांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT