Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Board: गोव्यात स्वतंत्र ‘काजू मंडळ’ स्थापन करणार! उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा; निर्यात क्षमतेचा घेतला आढावा

CM Pramod Sawant: गोव्याची प्रमुख कृषी उत्पादने आणि त्यांचा २०२४-२५ आर्थिक वर्षातील निर्यात क्षमतेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सेंद्रिय प्रमाणीकरणाचे सध्याचे स्थान व वाढीची दिशा यावरही चर्चा झाली.

Sameer Panditrao

पणजी : गोवा हे एक नैसर्गिक सेंद्रिय राज्य म्हणून ओळख निर्माण करत असून, कृषी क्षेत्रात विशेषत्वाने काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र ‘काजू मंडळ’ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला कृषीमंत्री रवी नाईक, गोवा फलोत्पादन विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमदार प्रेमेन्द्र शेट, गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, कृषी सचिव अरुण कुमार मिश्रा, आपेदाचे अध्यक्ष अभिषेक देव, यांच्यासह अन्य तज्ज्ञ उपस्थित होते.

गोव्याची प्रमुख कृषी उत्पादने आणि त्यांचा २०२४-२५ आर्थिक वर्षातील निर्यात क्षमतेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. गोव्यातील सेंद्रिय प्रमाणीकरणाचे सध्याचे स्थान व वाढीची दिशा यावरही चर्चा झाली.

सेंद्रिय निर्यातीस चालना देण्यासाठी पुढील दिशा आणि गोव्याच्या सहभागासाठी नियोजित महत्त्वाच्या कार्यक्रमांवरही चर्चा झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, “राष्ट्रीय जैविक उत्पादन कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेली सेंद्रिय प्रमाणीकरण प्रणाली व त्यामध्ये होणारे सुधार प्रस्तावित असून त्याचा गोमंतकीय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सन २०२४-२५ मध्ये भारताने २७.९० अब्ज रुपये इतकी कृषी निर्यात केली असून, या क्षेत्रात गोव्यास मोठी संधी आहे .” मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, गोव्याच्या शेतकऱ्यांच्या आणि निर्यातदारांच्या शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मार्ग तयार करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

SCROLL FOR NEXT