Goa Election Result 2022 News, Goa CM 2022 News  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या मुख्यमंत्री पदावरून संभ्रम कायम, भाजप नेत्यांची आज दिल्लीत विशेष बैठक

गोव्यातील राजकीय स्थितीवर चर्चा होणार

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. या दरम्यान ते गोव्यातील राजकीय स्थितीवर चर्चा करतील. (Pramod Sawant and BJP leaders hold special meeting in Delhi today)

गोवा राज्याच्या आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज 39 नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसह सुरुवात झाली. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ थेट स्कुटरवरुन विधानसभेत आले, तर काही वेळापुर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर हे मनोज परब यांच्यासोबत बुलेटवरुन विधानसभेत दाखल झाले. (Goa Election Result 2022 News)

गोव्‍यात पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती

दरम्यान, गोव्‍यात (Goa) पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नेता निवडीबाबतही मतभेद असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने राज्यपालांनी अधिकाराचा योग्य वापर करत हे अधिवेशन बोलाविले आहे.

राज्यपालांनी गावकर यांना पद आणि गोपनीयतेची दिली शपथ .

सोमवारी सकाळी राज्यपालांनी गावकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, विधानसभा सचिव नम्रता उलमन उपस्थित होते.आज सकाळी 11.30 वाजता या विशेष अधिवेशनाला सुरवात झाली. यात प्रामुख्याने राज्यात नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांच्या आमदारकीचा शपथ ग्रहण सोहळा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT