गोव्यात 39 आमदारांच्या शपथविधीने आठव्या विधानसभेची सुरुवात

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी शपथ घेतली आहे
Goa Assembly 2022
Goa Assembly 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गोवा राज्याच्या आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज 39 नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसह सुरुवात झाली. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ थेट स्कुटरवरुन विधानसभेत आले, तर काही वेळापुर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर हे मनोज परब यांच्यासोबत बुलेटवरुन विधानसभेत दाखल झाले. (Eighth Legislative Assembly Starts with swearing in of 39 MLAs in goa)

Goa Assembly 2022
मडगाव शासकीय इमारतींचे फायर ऑडिट फायलींपुरतेच मर्यादित

सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (P S Sreedharan Pillai) यांनी आमदारकीची शपथ दिली तसेच, इतर आमदारांना शपथ देण्याचे अधिकार दिले. यानंतर आमदार गणेश गावकर यांनी आज उर्वरित आमदारांना शपथ दिली.

नवनिर्वाचित आमदारांपैकी 15 आमदारांनी कोकणी, 7 जणांनी मराठी तर 17 जणांनी इंग्रजीतून शपथ घेतली. योगायोगाने, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी शपथ घेतली आहे. भाजप (Goa BJP) प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, होळीनंतरच नवीन सरकार स्थापन होईल.

गोव्‍यात पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती

सोमवारी सकाळी राज्यपालांनी गावकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, विधानसभा सचिव नम्रता उलमन उपस्थित होते.

दरम्यान, गोव्‍यात (Goa) पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नेता निवडीबाबतही मतभेद असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने राज्यपालांनी अधिकाराचा योग्य वापर करत हे अधिवेशन बोलाविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com