Praful Patel and Sanjay Raut on Goa tour on 18th january  Dainik Gomantak
गोवा

18 तारखेला प्रफुल पटेल आणि संजय राऊत गोवा दौऱ्यावर

यूपीतील 13 आमदार भाजप सोडणार, पवार कधी होणार पंतप्रधान?

दैनिक गोमन्तक

18 तारखेला प्रफुल पटेल (Praful Patel) आणि संजय राऊत (Sanjay Raut) गोवा दौऱ्यावर येणार आहे. काँग्रेससोबत (Congress) आघाडी संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) गोव्यात एकत्रित लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील महिन्यात होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भाजपचा (BJP) एकत्रितपणे सामना करण्यासाठी "समविचारी पक्षांसोबत" चर्चा सुरू असल्याचे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत हे तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांशी बोलत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पत्रकारांना सांगितले.

यूपीतील 13 आमदार भाजप सोडणार, पवार कधी होणार पंतप्रधान?'

संजय राऊत यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मंगळवारी त्यांच्या पत्रकार परिषदेत मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा ही केवळ सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत 13 आमदार भाजप सोडणार असल्याचे भाकीत केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी आपल्या ट्विटमध्ये "कर्मकांडाला विरोध करणारे शरद पवार ज्योतिषी कधीपासून झाले? शरद पवार आणि संजय राऊत यांचे अंदाज मनोरंजनासाठी चांगले आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशचे भाकीत करण्यापेक्षा या दोन महापुरुषांनी महाराष्ट्राचे भविष्य सांगावे. शरद पवार कधी पंतप्रधान होणार हे संजय राऊत यांनी सांगावे. उद्धव ठाकरे घराबाहेर कधी जाणार? सध्या राज्यात राजाही घरून काम करत आहे आणि जनताही घरून काम करत आहे, "असे लिहिले होते.

'भाजपला हिमालयाची उंची दिसणार नाही'

त्याच्या या टिकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच काम चांगलं सुरू आहे. ते 13 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांचे हिमालय आणि सह्याद्रीसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व तुमच्यासारख्या छोट्या ढिगाऱ्यांना दिसणार नाही. पंतप्रधानपद मिळाल्याने व्यक्तीचा दर्जा उंचावत नाही"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT