Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: झळ सोसावीच लागेल; ढवळीकर म्हणतात, वीज दरवाढ अटळ

वीज दरात प्रस्तावित 6 टक्के वाढीला ग्राहक आणि इतरांनी विरोध केला होता

Rajat Sawant

Goa Electricity: राज्यातील वीज दरात काही प्रमाणात वाढ होणे अटळ आहे. येत्या महिन्यापर्यंत आयोगाकडून दरवाढ प्रस्ताव येईल व त्यानंतर निर्णय होईस असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. जेईआरसीने गेल्या आठवड्यात घेतलेल्या जनसुनावणीदरम्यान वीज दरात प्रस्तावित 6 टक्के वाढीला ग्राहक आणि इतरांनी विरोध केला होता.

गेल्या आठवड्यात संयुक्त वीज नियमाक आयोगाने (जेईआरसी) घेतलेल्या जनसुनावणीचा संदर्भ देत ढवळीकर म्हणाले की, "जेईआरसी येत्या महिन्यापर्यंत वीज दरात सुधारणा करण्याबाबत आपला प्रस्ताव राज्य सरकारला सादर करेल. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर किती दरवाढ करायची याचा निर्णय सरकार घेईल."

"आम्ही जेईआरसीला राज्यात वीज दर वाढ करु नये अशी विनंती केली होती, परंतु त्यांनी सांगितले की, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. गोव्यातील लोकांना चांगल्या दर्जाची वीज मिळावी म्हणून थोडी फार झळ ग्राहकांना सोसावीच लागेल" असे त्यांनी सांगितले.

सरकार सौर उर्जा निर्मिती व हायड्रोजन उर्जेवर भर देत आहे. असे सांगून त्यांनी पुढील दोन वर्षांत राज्यात 150 मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्गिष्ट आहे. कदंब पठारावर वीज उपकेंद्राचे 25 कोटी रुपये खर्चाचे काम हाती घेतले जाणार आहे असे मंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: दारू पिऊन गाडी चालवणे जीवावर बेतले

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

Ameya Audi: अमेय अवदीचा युरोपात डंका! चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत विजेता, फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

Jasmine Flower: 'जायांचे मळे वाचवायचेच'! ग्रामसभेत ठराव मंजूर; व्यावसायिक, निवासी प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT