Power outages in Goa hurt industries Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात खंडित विजेमुळे उद्योगांचे नुकसान'

कोचकर: घरगुती वापरासाठीचे प्रति युनिट 10 ते 25 पैसे वाढले

दैनिक गोमन्तक

पणजी: महागाईने त्रस्त असलेल्या राज्यातील जनतेला आता वीजदरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी प्रतियुनिट 10 ते 25 पैसे वीज वाढली असून व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विजेचे दर कायम राहणार आहेत. असे असले तरी सध्या औद्योगिक वसाहतील वीज ग्राहकांना खुल्या बाजारातील दराप्रमाणे अतिरिक्त दराने वीजपुरवठा होत आहे.

यासंदर्भात, राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, वीज दरात थोडी वाढ झाल्यास उद्योगांना फारशी चिंता नाही. मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाची वीज आणि वारंवार खंडित होत असल्याने उद्योगांचे नुकसान होत आहे. उद्योगांनी खुल्या बाजारातून विजेचा अतिरिक्त खर्च उचलण्याचे मान्य केले असले तरी या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने अडचणी तशाच आहेत.

कोचकर पुढे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. सरकार पायाभूत सुविधा कर वसूल करत असूनही, हा पैसा कुठे जातोय, याची जबाबदारी नाही. वेर्णा औद्योगिक वसाहतीचे उदाहरण घ्या. वेर्णा येथील उद्योगांना उपकेंद्र उभारण्यासाठी भूखंड वीज विभागाला देण्यात आला. तथापि, हे उपकेंद्र सर्व किनारपट्टीच्या गावांना पुरविणारे आहे आणि ओव्हरलोड आहे. ट्रान्सफॉर्मर जुने असल्याने दुरुस्तीच्या कामामुळे वारंवार बिघाड होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

SCROLL FOR NEXT