Sudin Dhavalikar|Goa Bad Roads GNH
गोवा

Bad Roads In Goa: 'कारवाई व्हायलाच हवी'! खराब रस्त्यांबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला ढवळीकरांकडून समर्थन

Sudin Dhavalikar: कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे आपण स्वागत करीत असून संबंधित अभियंत्यांवरही कारवाई व्हायला हवी

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राज्यातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास हा अक्षम्य असाच असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे स्पष्ट मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

ढवळी येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील श्रीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी गणराया सर्वांना चांगली सुबुद्धी आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना केली. ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कपिल ढवळीकर यांनी वीजमंत्र्यांचे स्वागत केले. कवळेचे माजी सरपंच राजेश कवळेकर, विद्यमान सरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य सोनाली तेंडुलकर, माजी सरपंच सुखानंद कुर्पासकर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले, खराब रस्त्याला कारणीभूत कंत्राटदारांवर कारवाई व्हायलाच हवी. जनतेला चांगल्या सुविधा देणे हे सरकारचे काम आहे आणि ते व्यवस्थितरीत्या चालले असताना रस्त्याच्या प्रकरणावरून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे आपण स्वागत करीत असून संबंधित अभियंत्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

पुराव्यासह पुढे यावे!

नोकर भरतीत पैशांचा व्यवहार झाल्याच्या प्रकरणावर बोलताना ढवळीकर म्हणाले, तसे काही असेल तर पुराव्यांसह पुढे यायला हवे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना आपण चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि पैशांचा व्यवहार होणेच शक्य नाही, तसा जर आरोप असेल तर पुराव्यांसह पुढे यायला हवे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT