Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhawalikar: रिलायन्सकडून 200 कोटी जमा; 2024 नंतर वीज समस्या भेडसावणार नाही...

वीज मंत्री सुदिन ढवळीकरांची माहिती

Akshay Nirmale

Sudin Dhawalikar: रिलायन्सला नाफ्ता गॅसमधून वीज निर्मिती करण्यात अपयश आले. त्यामुळे या प्रकरणातील निवाड्यानुसार रिलायन्सला 200 कोटी रूपये दंड ठोठावण्यात आला होता.

ते दंडाचे 200 कोटी रूपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत, अशी माहिती, वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री ढवळीकर म्हणाले की, पावसाळ्यानंतर राज्यात वीज खात्याची 900 कोटींची कामे सुरू केली आहेत. आधी तसे विधानसभेत तसे सांगितले होते. 15 ऑक्टोबरच्या आत नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर 1600 कोटींची कामे सुरू करत आहोत. सर्व मतदारसंघात ही कामे होणार आहेत.

तसेच जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यांचे उद्घाटनही केले जाईल. विविध मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. त्याचे उद्घाटन केले जाईल. 2640 कोटी रुपये खर्चुन वीज खाते नव्या सुविधा उभारणार आहे. त्यामुळे 2024 नंतर वीज समस्या संपूष्टात येईल.

वीज खात्याला 20 टक्के नफा झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. रिलायन्स आर्बिट्रेशन निवाड्याचे पैसे सरकारी तिजोरी आले आहेत. नाफ्ता गॅसमधून वीज तयार करण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्याने त्यांना 200 कोटीचा दंड ठोठावला होता, असे त्यांनी सांगितले.

ढवळीकर म्हणाले, पेडणे आणि बार्देश तालुक्यात विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. 70 कोटी रूपयांचे 200 ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. 2024-25 मध्ये अनेक कामे होणार आहेत. वन क्षेत्र, शेती याबाबत जमिनीतील वीजेबाबतची कामे केली जात आहेत.

ते म्हणाले, भूमीगत केबलचे काम सुरू आहे. स्पर्धेमुळे काम काही दिवस काम बंद राहिल. स्पर्धेनंतर पुन्हा सुरू होईल.

तमनार प्रोजेक्ट सुरू आहे. तो केव्हा पूर्ण होईल, ते सांगू शकत नाही. झाला तर त्याचा फायदा गोव्यासह इतर राज्यांना होईल. 23 तारखेला मांद्रे येथे उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. फोंड्याहून भूमिगत केबल आणली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT