Potholes on road in Canacona Dainik Gomantak
गोवा

मडगाव-कारवार मार्गावर जलवाहिनी फुटल्याने खड्डे

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी

Subhash Mahale

काणकोण : एरव्ही पावसामुळे पडणारे खड्डे काणकोणात पाऊस नसतानाही दिसू लागलेत. मात्र काणकोणमध्ये मडगाव कारवार महामार्गाच्या हमरस्त्यावरील खड्ड्यात पाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. या खड्ड्यांमुळे अपघात झाले असले तरीही अजूनही रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याचं चित्र आहे. (Potholes on road in Canacona News Updates)

पाऊस नसतानाही काणकोणमधील (Canacona) खड्ड्यात पाणी दिसत असल्याने आता शहरात चर्चाही सुरु झाली आहे. खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मडगाव-कारवार हमरस्त्याच्या गुळे भागात हमरस्त्याच्या काही भागातून जलपुरवठा वाहिनी आहे. या वाहिनीची जोडणी तुटून परिसरातील हमरस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्डयाचा अंदाज येत नाही आणि साहजिकच अपघातांना (Accident) निमंत्रण मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी असाच एक दुचाकीस्वार गुळे भागातील या खड्ड्यात पडून अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुचाकीचालकावर सध्या गोमेकॉ (GMC) इस्पितळात उपचार सुरु आहेत. त्वरित फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून खड्डे बुजवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT