यंदा काणकोणात काजू हंगाम समाधानकारक

थंडी बऱ्यापैकी झाल्याने काजू हंगामाला गती मिळाल्याची कृषी अधिकाऱ्यांची माहिती
Cashew Production in Canacona Goa
Cashew Production in Canacona GoaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : अवकाळी पावसामुळे लांबलेला काजू हंगाम आता गती घेऊ लागला आहे. यंदा बऱ्यापैकी थंडी पडल्याने यंदा काणकोणात काजूचा हंगाम समाधानकारक असेल, असे विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले. (Cashew Production in Canacona Goa News Updates)

Cashew Production in Canacona Goa
गोव्यात भाज्यांचे दर कडाडल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं

बदलत्‍या वातावरणामुळे काजू (Cashews) हंगामाला सुमारे पंधरा दिवस विलंब झाला आहे. काणकोणात आताच काही भागात काजू बोंडे धरू लागली आहेत. पहिल्या धारेचे ‘हुर्राक’ तयार होण्यास किमान आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. राज्यात काजूबियांचा मोठा खरेदीदार असलेल्या गोवा (Goa) बागायतदार संस्थेने अद्याप दर जाहीर केलेला नाही. काणकोणबरोबरच राज्यातील सर्व काजू बागायती सेंद्रीय असून काजूबियांना चांगला दर मिळण्याची मागणी येथील काजू बागायतदारांनी केली आहे.

Cashew Production in Canacona Goa
फोंडा बसस्थानकानजीक आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

89 काजू झोन्स

काणकोण (Canacona) अबकारी कार्यालयाच्या अखत्यारीत एकूण 89 काजू झोन्स आहेत. या झोन्सची पावणी होते. 2 फेब्रुवारीला फक्त सात झोन्‍सची पावणी झाली. उर्वरीत 82 झोन्सची पावणी 2 मार्चला होणार असल्याचे काणकोणचे अबकारी अधीक्षक चंद्रनाथ ऊर्फ शेखर देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com