Potholes on footpath  Canva
गोवा

Kasarpal: कासारपाल सरकारी शाळेसमोरील पदपथावर खड्डे, पेव्हर्सचे काम अर्धवट; विद्यार्थ्यांना त्रास

गोमन्तक डिजिटल टीम

कासारपाल सरकारी शाळेसमोर घालण्यात आलेली पदपथ फुटलेल्या स्थितीत असून, या पदपथावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.यामधून शाळेत शिकणारी लहान मुले आणि त्यांचे पालक मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी येत असतात, फुटलेल्या पदपथांवरून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सदरची गोष्ट स्थानिक पंचायत सदस्यांच्या निदर्शनास आणून देऊन पंचायत सदस्य दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून शाळेसमोर पेव्हर्स बसवण्याचे काम अर्धवट स्थितीत असून लाद्याही टाकलेल्या नाहीत. ग्रामस्थांनी हा विषय वेळोवेळी ग्रामसभेत पंचायतीच्या नजरेस आणून देऊन या कामासाठी दुर्लक्ष होत आहे.

या सरकारी शाळेत अंगणवाडीपासून दहावीपर्यंतचे वर्ग भरविले जातात. लहान लहान मुले या शाळेत शिकत असून त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले गटार हे नावापुरती असून पावसाचे पाणी रस्त्यावरून जाऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहे, अशी खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatal Accident at Mandrem: मांद्रे येथे भीषण अपघातात २ मुलींनी गमावला जीव; ट्र्कचालक पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime: फ्लॅट देण्याचे आश्वासन, होंडा सत्तरीत महिलेची 26 लाखांची फसवणूक

Robbery at Mapusa: SBI कर्मचारी म्हणत घातला 2.36 लाखांचा गंडा, अज्ञाताचा शोध सुरू..

Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

'Heritage Master Plan तयार करा अन्यथा..'; जुने गोवे वाचवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीचा पुढाकार

SCROLL FOR NEXT