पणजी : कोविड- 19 मुळे गेल्या 24 तासात 63 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे राज्यात मृत्यूची संख्या 1938 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे राज्यात 35 टक्के पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे. राज्यात 2491 नवीन प्रकरणांची तर 2266 रुग्ण कोरोनातून बरे झालेल्यांची नोंद करण्यात आली आहे. नवीन प्रकरणांची भर पडल्यानंतर राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 33000 वर पोहचली आहे. गेल्या सात दिवसांत 436 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला. यात धक्कादायक बाब म्हणजे यातील 15 ते 20 टक्के रुग्ण ही संक्रमणाचा धोका वाढल्यानंतर काही तास आधी रुग्णालयात दाखल होतात. तर अनेक जण लक्षणे जाणवू लागल्यानंतर 8-10 दिवसांनी रुग्णालयात दाखल होत असल्याचे समोर आले आहे. (The positivity rate in the state drops 35 per cent)
एका आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील (Home Isolation) रुग्णांचे निरीक्षण करणे अवघड जात आहे. गुरुवारी केवळ 248 रूग्ण कोविड सेंटर मध्ये होते. तर अनेक रुग्ण ही विलगीकरणाचा कालावधी संपण्याआधीच बाहेर फिरतात. त्यांच्यामुळे संक्रमणाचा धोका वाढत जातो. ही सर्व पाहता असे लोक जबाबदरीने वागतील यांची कोणतीही शस्वती देता येत नाही. त्यामुळे गर्दीग्रस्त भागात राहणारी आणि मोठ्या कुटुंबातील कोविड-19 रुग्णांना कोविड सेंटरमध्ये हलविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
त्याचबरोबर, अल्पसंख्याक लोक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक जे स्वत: ची काळजी घेऊ शकत नाही किंवा ज्यांची काळजी घेणारे कोणी नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांकडे टॅब असणे शक्य नाही, त्यामुळे त्यांचे पॅरामीटर्स अस्थिर दिसत असल्यास त्यांना उशीर होण्यापूर्वी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे. असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उत्तर गोव्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सांगितले की, त्याच्या गावातल्या एका मोठ्या कुटूंबातील काही जण कोविड-19 पॉझिटिव्ह होते. तरीही ते बाहेर फिरत होते. शेजाऱ्यांनाही त्यांना संसर्ग झाल्याचे माहीत नव्हते. त्यांच्यामुळे गावातील अनेक जणांना संसर्ग झाला. मात्र आम्ही त्यांच्याविरुद्ध काहीच करू शकलो नाही. त्यामुळे अशा लोकांना थेट उचलून कोविड सेंटरमध्ये उभे करायला हवे, असे त्या सरपंचांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.